इचलकरंजी शहरातील कापड व्यापारी रामरतन डोगीवाल यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या अश्‍विनी ओझा या अनेक व्यापार्‍यांना गैरार्गाने धमक्या देतात. त्यांच्यावर कठोर कारवाई करून न्याय द्यावा, अशी मागणी शहरातील व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळाने अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांना दिले आहे.

Must Read

1) भिडे गुरूजींचा निशाणा

2) एकनाथ खडसे संतापले, म्हणाले...

3) जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणीच वैद्यकीय महाविद्यालय उभारणीची प्रक्रिया सुरू करा'

4) मुलीच्या जन्माने नशीबच बदललं, दोन दिवसांमध्येच...

5) कोविड सेंटरमधून कुख्यात गुंड पळाला

चार दिवसापूर्वी कापड व्यापारी रामरतन डोगीवाल यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांना अश्‍विनी ओझा यांनी कर्ज मंजूर करुन देण्याचे सांगत 10 लाख रुपये घेतले होते. पण कर्जही मिळाले नाही शिवाय 10 लाख रुपये परत मिळत नसल्याने डोगीवाल यांनी आत्महत्या केली. तत्पूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटच्या आधारे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अश्‍विनी ओझा यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. 

ओझा यांनी व्यापार्‍यांना वेगवेगळी आमिषे दाखवून लुबाडले आहे. त्याचबरोबर गैरमार्गाने त्या व्यापार्‍यांना धमकीही देत असल्याने व्यापार्‍यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. डोगीवाल यांच्या सुसाईड नोटवरून ओझा या सराईत गुन्हेगार असल्याचेही स्पष्ट होते. त्यामुळे ओझा यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

शिष्टमंडळात भंवरलाल चौधरी, नंदकुमार पारीख, श्रीरंग खवरे, हरीराम चौधरी, तुकाराम पवार, चेवाराम चौधरी यांचा समावेश होता.