इचलकरंजी येथील दिवाळीनंतर पूजाविधीनंतरचे निर्माल्य नदीत टाकण्यापासून नागरिकांना परावृत्त करण्यासाठी इचलकरंजी नागरिक मंचच्यावतीने पंचगंगा नदीघाटावर नदी वाचवा मोहिम राबविण्यात आली.

दरवर्षी दिपावलीनंतर शहरातील नागरिक उत्तरपूजेनंतर नैवेद्य व पूजेचे साहित्य फळे, फुले नदीत टाकण्याची परंपरा आहे. परंतु त्यामुळे पंचगंगा नदीच्या प्रदूषणात वाढच होत असून त्याचे परिणाम नदीकाठावरील गावांना भोगावे लागतात. त्यासाठी इनामं मार्फत पंचगंगा नदी स्वच्छतेसाठी नेहमीच आवाज उठवला जात असून कृतीशील कार्यही केले जाते. नदीघाट स्वच्छता मोहीम, गणेशोत्सवानंतर प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बाहेर काढून प्रशासनाच्या मदतीने इतरत्र सोय करणे तसेच स्मशानभूमी स्वच्छता असे उपक्रम राबवले जातात. 

Must Read

1) धोनीने संधी दिलेल्या फास्ट बॉलरची क्रिकेटमधून निवृत्ती

2) जयसिंगरावांनी पक्ष सोडला, पंकजा मुंडेंनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया

3) ...नाहीतर तुमचे सगळे धंदे बाहेर काढणार; निलेश राणेंचा भास्कर जाधवांना इशारा

4) RBI ची मोठी घोषणा!

5) पठ्ठ्याने खरोखरच किडनी विकून आयफोन घेतला

त्याच अनुषंगाने लक्ष्मीपूजनानंतर केलेल्या आवाहनानुसार इचलकरंजी नागरिक मंचच्या सदस्यांनी सकाळी 8 ते 11 पर्यत नागरिकांना नदीचे महत्व पटवून देऊन पाने, फुले, हार कुंडात तर नैवेद्य गोमातेस देण्यासाठी प्रवृत्त केले.

त्यामध्ये पत्रकार बसवराज कोटगी, उदय निंबाळकर, अमोल मोरे, उमेश पाटील, अमृत पारीख, व्यंकटेश पाटील,   संजय डाके, केतन कोटगी यांनी सहभाग घेतला. तर टिव्ही नाईनचे पत्रकार साईनाथ जाधव यांचे सहकार्य लाभले. प्रशासनाने नेहमीप्रमाणे प्रदूषण करणार्‍या व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याबाबत सोशल मिडियावरून प्रसिद्धी केली. परंतु नगरपालिका अथवा पोलिस प्रशासनाचे कोणीही नदीपरिसरात फिरकले नाही. दुपारी नेहमीप्रमाणे नागरिकांनी घाटावर गर्दी केल्याने इचलकरंजी नगरपरिषदेचे स्वच्छतादूत गजानन महाजन गुरुजी एकटेच नदीपात्रातून निर्माल्य बाहेर काढत होते. याबाबत नगरपालिका प्रशासन व शहरातील लोकप्रतिनिधी यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.