इचलकरंजी येथे दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर नगरपरिषद कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी त्याचबरोबर सुट्टी दिवशी काम केलेले सफाई कर्मचारी आणि मक्तेदारांच्या प्रलंबित बिलापोटी नगरपरिषदेने जवळपास 7 कोटी रुपये दिवाळीपूर्वी अदा केली असल्याची माहिती उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Must Read

1) धोनीने संधी दिलेल्या फास्ट बॉलरची क्रिकेटमधून निवृत्ती

2) जयसिंगरावांनी पक्ष सोडला, पंकजा मुंडेंनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया

3) ...नाहीतर तुमचे सगळे धंदे बाहेर काढणार; निलेश राणेंचा भास्कर जाधवांना इशारा

4) RBI ची मोठी घोषणा!

5) पठ्ठ्याने खरोखरच किडनी विकून आयफोन घेतला

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर नगरपरिषदेचे कार्यरत तसेच सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी नगरपरिषद कर्मचारी कृती समितीच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष यांना भेटून या मागण्या संदर्भात निवेदन दिले होते. या संदर्भात नगरपरिषदेकडील कार्यरत 1185 कर्मचार्‍यांना प्रत्येकी 13 हजार सानुग्रह अनुदानापोटी 1.50 कोटी रुपये, सुमारे 1600 सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकापोटी प्रत्येकी 7 हजार रुपये प्रमाणे 1 कोटी 12 लाख रुपये, जानेवारी 2020 पासून सेवानिवृत्त झालेल्या 25 कर्मचार्‍यांना पेन्शन उपदानासाठीचे 1 कोटी 20 लाख रुपये, 

त्याचबरोबर आरोग्य विभागाकडे सुट्टीच्या दिवशी काम केलेल्या सफाई कर्मचार्‍यांना वेतनापोटी 8 लाख 50 लाख रुपये आणि नगरपरिषदेकडे काम करणार्‍या मक्तेदारांच्या प्रलंबित बिलापोटी जवळपास 3 कोटी रुपये दिवाळीपूर्वी अदा करणेत आलेले आहेत. दिवाळीपूर्वी रक्कम हातात पडल्याने कर्मचारी आणि मक्तेदारांतून समाधान व्यक्त होत आहे.

या कामी नगराध्यक्षा अ‍ॅड. सौ. अलका स्वामी, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, नगरसेवक मदन कारंडे, सुनिल पाटील, सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, मदन झोरे, उदयसिंग पाटील यांचे सहकार्य लाभल्याचेही उपनगराध्यक्ष पोवार यांनी सांगितले.