Make-Devendra-Fadnavis-Chief-Minister-again

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्याशी चर्चा करून काही उपयोग नाही. भाजप नेते देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadanvis) पुन्हा मुख्यमंत्री बनवा, मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यास त्यांना मी भाग पाडतो, असं भाजप खासदार उदयनराजे भोसले (BJP MP Udayanraje Bhosale) यांनी सांगितलं आहे. तसेच खासदार छत्रपती संभाजीराजे यांची मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी नेमणूक करा आम्ही प्रश्न एका दिवसात सोडवतो, असंही उदयनराजे यांनी सांगितलं.

खासदार उदयनराजे साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavisहे आपल्याच वयाचे आहेत. त्यांनी आरक्षण टिकवलं, त्यांना नाव ठेवली जातात. आता सत्तेत आहात ना मराठा आरक्षणाला पुढे न्या. सत्तेत राहायचंय ना, महाराष्ट्र आहे, मराठा समाज निर्णायक जात आहे. जातीतला कोणताही उमेदवार असू देत, त्याच्याकडून मराठा आरक्षणाचा प्रश्न तडीला लावणार, असं आश्वासन घ्या, असंही उदयनराजे यांना सांगितलं.

Must Read

1) राष्ट्रवादीने 'त्या' बंडखोर नेत्याची केली पक्षातून हकालपट्टी

2) शेतकरी आंदोलकांवर दंगलीचे गुन्हे

3) 'भाजपमधून लवकरच ते नेते राष्ट्रवादीत येणार'

4) 1 डिसेंबरपासून विशेष ट्रेन्सच्या वेळापत्रकात बदल

5) अनैतिक संबंध तोडले म्हणून महिलेची अश्लील छायाचित्र मुलांना पाठवली

6) लग्न समारंभातून घरी जाताना तरुणांवर काळाचा घाला 


खासदार उदयनराजे म्हणाले, शरद पवारांशी चर्चा करुन काही उपयोग नाही. आधीच्या प्रश्नावर त्यांनी आधी उत्तरं द्यावी. मार्ग निघणार असेल तर चर्चा करावी. सत्र कोर्टातही तारीख देतात. मग सुप्रीम कोर्टानं तारीख दिली नाही. राज्य शासनाचा वकील हजर राहात नाही, असा आरोपही उदयनराजे यांनी यावेळी केला. इतरांना जसे आरक्षण मिळाले तसे मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असं उदयनराजे म्हणाले.

ही लोकं मोठी नाहीत, केवळ वयानं मोठी झाली आहेत...

मराठा समाजाचं आरक्षण स्थगित व्हायला सगळेच जबाबदार आहेत. कुणाचं नाव घेऊन मी कुणाला मोठं करणार नाही. ही लोक मोठी नाहीत, केवळ वयानं मोठी आहेत, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना टोला लगावला.

लोकांनी यांना मान सन्मान दिला, निवडून दिलं. हीच लोक वेळ आली तर खाली खेचतात. लोकं यांना रस्त्यावर येऊ देणार नाही, घरात जाऊन जाब विचारतील, असंही उदयनराजे यावेळी म्हणाले. मराठ्यांचा उद्रेक घडला तर त्याला हीच लोकं जबाबदार राहातील, असा इशारा देखील यावेशी त्यांनी दिला.

खासदार उदयनराजे म्हणाले की, 'मला समजत नाही, की शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं. सर्वधर्म समभावाचा विचार सांगायचा आणि एखाद्या समाजाला दाबण्याचं काम अनेक वर्षांपासून झालं आहे. मी मराठा म्हणून जन्माला आलो असलो तरी मराठा म्हणून बोलत नाही. शिवाजी महाराजांच्या विचारांचा आधार घेऊन, प्रत्येक समाजाला न्याय मिळायला हवा या भूमिकेतून आज मुद्दे मांडणार आहे. किती दिवस मराठा समाजाचा अंत पाहणार आहात. मंडल आयोगावेळी मराठा समाजाचा विचारा का केला नाही?' असा सवाल देखील उदयनराजेंनी उपस्थित केला.

आता कुबट वास यायला लागला आहे. छत्रपतींचे नाव घ्यायचे आणि राजकीय दृष्टिकोन ठेवायचा आणि एखाद्या समाजाला दाबायच काम केलं जात आहे. आधीच्या पीढीतल्या लोकांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला, असं ते म्हणाले. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी केवळं होणार, झालं असं आश्वासन दिलं जातं. जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा. प्रश्न सोडवता येत नसेल तर राजीनामा द्या आणि घरी बसा, अशा शब्दात त्यांनी आरोप केला आहे.