इचलकरंजी येथील आसरानगर परिसरातील कचरा डेपोत आग लागल्याने शुक्रवारी परिसरात धुराचे लोट पसरले होते. याठिकाणी सतत आग लागण्याचे प्रकार घडत असल्याने परिसरातील  नागरिकांनी आंदोलने करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी वारंवार केली आहेा. परंतु, नगरपरिषदेचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त नागरिकांनी नगरपरिषदेचा निषेध नोंदवताना आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

Must Read

1) मोदी सरकारची लाखो लोकांना दिवाळीची भेट

2) कोरोनामुळे भाजप आमदाराचा मृत्यू

3) तुमचा गॉडफादर कोण ? दानवेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

4) ...म्हणून राज ठाकरेंनी तिघींचं केलं कौतुक

5) Covid 19 : भारतात वॅक्सिनची गरज लागणार नाही, AIIMS ने दिले संकेत

सांगली नाका परिसरातील मैलखड्डा या कचरा डेपोवर शहरातील सर्व कचरा एकत्र केला जातो. या डेपोच्या परिसरात मोठी नागरी वस्ती असून कचरा डेपोला सतत आग लागत असल्याने नागरीकांना नाहक त्रास सोसावा लागतो. या विरोधात नागरिकांनी सातत्याने आंदोलने करूनही कोणतीच उपाययोजना नगरपरिषदेकडून केली जात नाही. शुक्रवारी पुन्हा याठिकाणी आग लागली. आग लागल्याचे समजल्यानंतर नागरिकांनी नगरपरिषदेशी संपर्क साधून माहिती दिली. मात्र संबंधित अधिकारी अथवा कर्मचारी कोणीही कचरा डेपोकडे फिरकलेच नाहीत. एैन दिवाळीत पुन्हा धुराचा त्रास असहय्य झाल्याने संतप्त नागरिक डेपोजवळ जमले. त्याची माहिती मिळताच नगरसेवक राहुल खंजिरे, संजय केंगार यांनी त्याठिकाणी धाव घेऊन व्यथा जाणून घेतल्या. नगरसेवकांनीही अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तिकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पुन्हा आगीची घटना घडण्यापूर्वी त्वरीत उपाययोजना न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.