इचलकरंजी येथे मराठा समाजाचे आरक्षणासह अन्य न्याय हक्कांसाठी वेगवेगळे लढण्याऐवजी सर्वांनी एकजुटीने ताकदीने हक्क मिळविण्यासाठी कार्यरत झालो आहोत. खासदार  छत्रपती उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण एकत्र आलो आहोत. कर्म मराठा, धर्म मराठा हे ब्रिदवाक्य घेऊन मराठा जोडो अभियान सुरु करण्यात येणार असल्याची माहिती इचलकरंजी सकल मराठा समाजाचे प्रवक्ते पुंडलिक जाधव व शहराध्यक्ष पै. अमृत भोसले यांनी दिली.

Must Read

1) रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी?

2) अवघ्या १ रुपयांत खरेदी करा सोनं ! PhonePe ची ऑफर

3) ऑनलाईन काम देण्याच्या नावाखाली घरी बोलावून इंजिनिअर मुलीवर बलात्कार

4) "शरद पवार अजितदादांना नाही सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील”

5) त्या आजाराने गेला असता बाहुबलीच्या भल्लालदेवचा जीव

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील सर्वच मराठा संघटनांना एकत्र करुन इचलकरंजी सकल मराठा समाजाची बांधणी केली आहे. त्याची कार्यकारीणी मंगळवारी पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली.सकल मराठा समाज इचलकरंजी शहर अध्यक्षपदी पै. अमृत भोसले, कार्याध्यक्षपदी मोहन मालवणकर तर उपाध्यक्षपदी अमरजित जाधव, अरविंद माने, खजिनदारपदी भारत बोंगार्डे, सचिवपदी शशिकांत मोहिते, सहसचिवपदी वैभव खोंद्रे यांची आणि सदस्यपदी रणजित जाधव, किसन शिंदे, राजवर्धन नाईक, नितीन कोकणे, नितीन पाटील, मनोज साळुंखे, शहाजी भोसले, संतोष सावंत, प्रमोद खुडे, विठ्ठल येसाटे, प्रसाद जाधव, नागेश पाटील, गणेश जाधव, उदय निंबाळकर, किशोर निंबाळकर, अजित शिंदे, अभिजित रवंदे, दिलीप पाटील शिवाजी पाटील व सागर कचरे यांची निवड करण्यात आली आहे.

प्रवक्तापदी पुंडलिक जाधव, पै. अमृता भोसले, मोहन मालवणकर आणि दीपक रावळ यांची तर सिव्हिक बोर्डात आबा जावळे, पुंडलिक जाधव, उदय लोखंडे, आनंदराव नेमिष्टे, बंडोपंत लाड, प्रकाश मोरे, प्रकाश मोरबाळे, सुनिल शेलार, संजय जाधव, सचिन हळदकर, राजाराम बोंगार्डे व रविंद्र माने यांची निवड करण्यात आली आहे.

मराठा जोडो अभियान अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासह समाजासाठी विकासात्मक कामे करणे, समाजातील नवयुवकांसाठी शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात काम करणे, सर्वच विभागाचे परिक्षण करुन विभागनिहाय कमिट्या तयार करणे, 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना सामावून घेऊन कार्यरत राहणे या उदात्त हेतुने शहर व परिसरातील सर्व मराठा समाजबांधवांना व संघटनांना एकत्र केले आहे. 

आरक्षणाच्या लढ्याला बळ देण्यासह सर्वांनी एकजुटीने कार्यरत राहण्यासाठी ही कार्यकारीणी करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने शहर कार्यकारीणी, सिव्हिक बोर्ड आणि प्रवक्ते यांची कार्यकारीणी जाहीर करण्यात आली आहे. या माध्यमातून मराठा जोडो अभियान राबवत भागाभागात बैठका घेऊन जनजागृती केली जाणार आहे.

याप्रसंगी प्रा. युवराज मोहिते, किसन शिंदे, राजाराम बोंगार्डे आदींसह मराठा समाजातील युवक, ज्येष्ठ उपस्थित होते.