पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या 1 डिसेंबर रोजी होत असलेल्या निवडणूकीच्या मतदानासाठी इचलकरंजीत  यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरात  पदवीधर मतदारसंघासाठी 13 तर शिक्षक मतदार संघासाठी 2 मतदान केंद्रे असणार आहेत. पदवीधरमधून तब्बल 62 तर शिक्षक मतदार संघातून 35 जण नशीब आजमावात आहेत. इचलकरंजीत पदवीधर मतदार संघात 6558 तर शिक्षक मतदार संघासाठी 1027 मतदार आहेत.

Must Read

1) कोल्हापुरात कडक बंदोबस्त,पोलिस सज्ज

2) जिल्ह्यात आज १९ रूग्णांची भर

3) मोठी बातमी : 'कोविडशील्ड' लशीमुळे गंभीर साइड-इफेक्ट; 5 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी

4) डिसेंबर महिन्यात १४ दिवस बँका बंद राहणार

5) कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ कायम

6) हार्दिक पांड्याने मध्येच हा निर्णय घेऊन सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का

दरम्यान, सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शहरातील मतदान केंद्रांना भेटी देऊन माहिती घेऊन योग्य त्या सूचना केल्या.

पदवीधर मतदार संघाच्या मतदानासाठी इचलकरंजी शहरातील विठ्ठल रामजी शिंदे विद्यामंदिर येथे 2, गोविंदराव हायस्कूल येथे 3, व्यंकटराव हायस्कूल येथे 4, आ.रा. पाटील विद्या मंदिर येथे 4 अशी एकूण 13 मतदान केंद्रे आहेत. तर शिक्षक मतदार संघाच्या मतदानासाठी विठ्ठल रामजी शिंदे विद्या मंदिर येथे खोली क्र. 10 आणि 11 अशी दोन मतदान केंद्रे करण्यात आली आहेत. इचलकरंजीत 1027, हुपरीत 136 आणि रुईत 84 शिक्षक तर 6558 इतके पदवीधर मतदार आहेत.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणूकीसाठी हातकणंगले तालुक्यात मतदानासाठी 288 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, शिपाई यांचा समावेश असून तीन टप्यात प्रशिक्षण देण्यात आले आहे. कोरोनाच्या उपाययोजनेची कडक अंमलबजावणी सर्व मतदान केंद्रावर करण्यात येईल. यावर्षीच्या निवडणूकीत सर्व केंद्रावर कोरोनामुळे प्रत्येक केंद्रावर 500 मतदार संख्या आहे. मतदानासाठी येणार्‍या प्रत्येकाला मतदार असल्याच्या पुराव्याची 100 टक्के खात्री मतदान केंद्रावर द्यावी लागणार आहे.

मागील प्रत्येक निवडणुकीपेक्षा या वर्षीची पदवीधर व शिक्षक निवडणूक अटीतटीची ठरत आहे. आरोप प्रत्यारोपाने पुणे मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. हातकणंगले निवडणूक शाखेने जिल्हा मार्गावर स्थिर निरीक्षण पथके उभारून वाहनांची कडक तपासणी सुरू केली आहे. किणी टोलनाका व इचलकरंजी येथील पंचगंगा नदी पूल या दोन ठिकाणच्या चेक पोस्टवर वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. तालुका कार्यक्षेत्रात प्रवेश करणार्‍या व बाहेर जाणार्‍या वाहनांची तपासणी केली जात आहे. पैशाची वाहतूक, अवैध मद्यसाठा, शस्त्रसाठा व संशयास्पद वस्तूवर विशेष वॉच ठेवला जात आहे. पथक प्रमुखाच्या निरीक्षणाखाली एक पोलिस व कर्मचारी तैनात आहेत. चेकपोस्टवरील अधिकारी, कर्मचार्‍यांना कामकाजामध्ये निष्काळजीपणा न करण्याच्या सूचना संबंधित पथनिर्देशीन अधिकार्‍यांनी केल्या आहेत.