हिंदू संस्कृतीत दिवाळी सणाला विशेष महत्त्व आहे. प्रकाशाचा उत्सव म्हणून ओळखल्या जाणार्‍या दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली होती. मुख्य दिवसाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत प्रचंड उलाढाल झाली.

Must Read

1) मोदी सरकारची लाखो लोकांना दिवाळीची भेट

2) कोरोनामुळे भाजप आमदाराचा मृत्यू

3) तुमचा गॉडफादर कोण ? दानवेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

4) ...म्हणून राज ठाकरेंनी तिघींचं केलं कौतुक

5) Covid 19 : भारतात वॅक्सिनची गरज लागणार नाही, AIIMS ने दिले संकेत

कपडे, आकाशकंदील, फटाके, लाईटिंग माळ, पुष्पहार, पणत्या, रांगोळी, ज्वेलरी, फराळ, मिठाई अशा विविध प्रकारच्या वस्तूंचे या उत्सवात आकर्षण असते. लक्ष्मीपुजनाचे महत्त्व मोठे असल्याने त्याच्या पूर्वतयारीसाठी अवघे शहर गुंतले होते. बाजारपेठेत झेंडूची आवक चांगली झाली होती. लक्ष्मीच्या मूर्ती, फोटो, 5 फळे, पुजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. लक्ष्मीचे रूप म्हणून पुजा होणार्‍या केरसुणीची विक्री जोरदार सुरु होती. सणाचा उत्साह सर्वत्र दिसून येत होता.

दिवाळीच्या खरेदीसाठी अवघे शहर खरेदीसाठी रस्त्यावर दिसून येत होते. रात्री उशिरापर्यंत दुकानांमध्ये गर्दी होती. शहरातील महात्मा गांधी पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मुख्य मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा विविध वस्तूंचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. तर रस्त्याच्या मधोमध लहान-सहान विक्रेत्यांनी आपापली दुकाने थाटली होती. त्यामुळे हा मार्ग रात्री उशीरापर्यंत खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

दिवाळीच्या खरेदीच्या निमित्ताने होणारी गर्दी लक्षात घेऊन शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सपोनि नंदकुमार मोरे यांनी मुख्य मार्गावरील वाहतूकीसाठी नियोजन केले आहे. गर्दीमुळे दुचाकी वाहनांसाठी रस्ते बंद करण्यात आले होते.

दिवाळीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच शुक्रवारी यंत्रमाग कामगारांच्या हातात बोनसची रक्कम पडल्याने ठिकठिकाणी बाजारपेठांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी दिसून आली. पणत्या, रांगोळी, लायटिंग, कंदील, सजावटीचं साहित्य घेण्यासाठी ग्राहकांची लगबग बाजारात आहे. सध्या रेडीमेड रांगोळीचा साचा वापरण्याची मोठी क्रेझ आहे. त्यामुळे विविध डिझाईन्समध्ये रांगोळी साचे उपलब्ध आहेत. पणत्यांमध्येही बरीच व्हरायटी असून हल्ली आकर्षक डिझाईनमधल्या कँडल्सही मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जाताहेत.