इचलकरंजी येथे कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची भिती व्यक्त होत असून प्रत्येक व्यक्ती जगली पाहिजे यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. अशावेळी आंदोलन करण्यापेक्षा कोरोनामुक्त महाराष्ट्रासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत. आंदोलनासाठी एकत्र जमून  गर्दी करुन त्यातून कोरोनाचा प्रार्दुभाव वाढण्याची शक्यता आहे. राजकारणावेळी राजकारण जरूर करूया. परंतु आता कोरोनाचा धोका टाळण्यासाठी प्रत्येकाने दक्षता रहावे, असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केले. राज्य सरकार संवेदनशील असून आचारसंहिता संपताच वीज बिल माफी संदर्भात सर्वांनाच गोड बातमी मिळेल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

Must Read

1) रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी?

2) अवघ्या १ रुपयांत खरेदी करा सोनं ! PhonePe ची ऑफर

3) ऑनलाईन काम देण्याच्या नावाखाली घरी बोलावून इंजिनिअर मुलीवर बलात्कार

4) "शरद पवार अजितदादांना नाही सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील”

5) त्या आजाराने गेला असता बाहुबलीच्या भल्लालदेवचा जीव

इचलकरंजीत वीज बिल माफीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर खासदार माने यांनी पत्रकार परिषदेत आपली व राज्य शासनाची भूमिका मांडली. ते म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असून पुन्हा लॉकडाऊन कोणालाही परवडणारे नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी प्रत्येकाने दक्ष राहण्याची गरज आहे. राज्य सरकार संवेदनशील असून कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ बसली. शासनानेही गोरगरीब जनता, कष्टकरी, शेतकर्‍यांसाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना जाहीर केल्या. राज्य सरकारला निर्णय घेण्यास विलंब होत असला तरी ते जनतेच्याच हिताचा निर्णय घेणार आहे. आंदोलनासाठी एकत्र येऊन गर्दी केल्याने त्यातून कोरोनाचा प्रार्दुभाव वाढण्याची शक्यता आहे.

कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्य सरकारला केंद्राकडून 38 हजार कोटी रुपयांचा परतावा अद्याप मिळालेला नाही. ती रक्कम मिळाल्यास अन्य योजनांसाठी वापरता येईल. परंतु या संदर्भात विरोधक काहीच बोलत नाहीत. त्यामुळे आंदोलन करण्यापेक्षा कोरोनामुक्त महाराष्ट्रासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी मदन कारंडे, सयाजी चव्हाण, महादेव गौड, रविंद्र माने, रवि लोहार, भाऊसो आवळे, महेश बोहरा, महेश ठोके उपस्थित होते.