इचलकरंजी येथे आगामी सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस रेकॉर्डवरील दोघा गुन्हेगारांना कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. प्रकाश नवनाथ जगदाळे (जवाहरनगर) व गणेश जयवंत सावंत (हुपरी) अशी त्यांची नांवे आहेत. जगदाळे याला 1 वर्षासाठी तर सावंत याला 6 महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

Must Read

1) भिडे गुरूजींचा निशाणा

2) एकनाथ खडसे संतापले, म्हणाले...

3) जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणीच वैद्यकीय महाविद्यालय उभारणीची प्रक्रिया सुरू करा'

4) मुलीच्या जन्माने नशीबच बदललं, दोन दिवसांमध्येच...

5) कोविड सेंटरमधून कुख्यात गुंड पळाला

खून, जबरी चोरी, दरोड्याची तयारी, मारामारी, सरकारी कामात अडथळा, विनयभंग अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असणार्‍यांना सण व उत्सव शांततेत पार पडावेत व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हद्दपार करण्यात येत आहे. त्याबाबतचा अहवाल पोलिस उपअधिक्षक बाबुराव महामुनी यांनी प्रांताधिकारी कार्यालयाकडे पाठविला होता. त्याला प्रांताधिकार्‍यांनी मंजूरी दिली आहे. त्यानुसार प्रकाश जगदाळे आणि गणेश जयवंत सावंत यांना कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.