इचलकरंजी येथे प्रशासनाकडून बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकही नवा रूग्ण आढळून आला नाही. सध्या केवळ 7 अ‍ॅक्टीव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील रूग्ण संख्या दिवसेंदिवस घटू लागल्याने  शहरवासियांना दिलासा मिळाला आहे. शहरात आज अखेर कोरोना बाधितांची संख्या 3991 आहे. तर 3790 जर कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. कोरोना मृत्यूंची संख्या 194 वर स्थिरावली आह. कोरोना रूग्णांची संख्या कमी होवू लागली असली तर दिवाळीच्या पार्श्‍वभुमीवर बाजारपेठेत मोठी गर्दी होवू लागल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाची दुसरी लाट पसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून गर्दी जाणे टाळावे असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Must Read

1) धोनीने संधी दिलेल्या फास्ट बॉलरची क्रिकेटमधून निवृत्ती

2) जयसिंगरावांनी पक्ष सोडला, पंकजा मुंडेंनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया

3) ...नाहीतर तुमचे सगळे धंदे बाहेर काढणार; निलेश राणेंचा भास्कर जाधवांना इशारा

4) RBI ची मोठी घोषणा!

5) पठ्ठ्याने खरोखरच किडनी विकून आयफोन घेतला