इचलकरंजी ते टाकवडे दरम्यान रस्त्याची झालेली दूरवस्था दूर करण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी स्वत: पुढाकार घेत जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून या रस्त्यावर मुरुम टाकून तो वाहतूक योग्य केला. या कामामुळे वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

Must Read

1) धोनीने संधी दिलेल्या फास्ट बॉलरची क्रिकेटमधून निवृत्ती

2) जयसिंगरावांनी पक्ष सोडला, पंकजा मुंडेंनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया

3) ...नाहीतर तुमचे सगळे धंदे बाहेर काढणार; निलेश राणेंचा भास्कर जाधवांना इशारा

4) RBI ची मोठी घोषणा!

5) पठ्ठ्याने खरोखरच किडनी विकून आयफोन घेतला

इचलकरंजीतील काळ्या ओढ्याच्या पुढे टाकवडेकडे जाणारा रस्ता पाइप लाईनसाठी खुदाई करण्यात आला. परंतु खुदाईनंतर योग्यरितीने खड्डे न मुजवल्याने रस्त्यावर चर निर्माण होऊन तो वाहतूकीसाठी धोकादायक बनला होता. हा रस्ता इचलकरंजी आणि शिरोळ तालुक्याला जोडणारा महत्वाचा आणि दैनंदिन वर्दळीचा रस्ता आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्ती संदर्भात सातत्याने नगरपरिषदेकडे मागणी करुनही त्याकडे दुर्लक्षच केले गेले. 

त्यामुळे आमदार प्रकाश आवाडे यांनी जवाहर कारखान्याच्या माध्यमातून या रस्त्यावर मुरुम टाकून तो वाहतूक योग्य करुन घेतला होता. त्यावेळी नगरपरिषद प्रशासनाकडून हा रस्ता करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु त्याला मोठा कालावधी लोटला तरी प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्याने रस्त्याची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाली होती.

सध्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु असून या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक होते. पण रस्त्यामुळे एखादा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने आमदार आवाडे यांनी बुधवारी पुन्हा या रस्त्याला भेट देऊन त्याची पाहणी केली. यावेळी जवाहर कारखान्याचे सुदेश मोरे तसेच अरुण एैनापुरे उपस्थित होते. आमदार आवाडे यांनी माहिती घेत जवाहर साखर कारखान्याच्या माध्यमातून दुसर्‍यांदा या रस्त्यावर मुरुम टाकण्यास सुरुवात केली आहे. इतके सारे घडूनही नगरपरिषद प्रशासन मात्र ढिम्मच असून तेथील कारभाराबद्दल नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एखादी दुर्घटना घडण्याची नगरपरिषदेकडून प्रतिक्षा केली जात आहे काय असा सवालही व्यक्त होत आहे.