Aquarius Horoscope तुमच्यापैकी काही जण बºयाच कालावधीपासून कामकाजासाठी खूप अतिरिक्त वेळ देत आहात आणि त्यामुळे तुमची ऊर्जा कमी झाली आहे - आज सगळ्या तणाव व द्विधा मन:स्थितीचा आजचा शेवटचा दिवस असावा असे तुम्हाला वाटेल. अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल. तुमच्या अतिखर्चिक जीवनशैलीमुळे तुम्हाला घरात तणावाचा सामना करावा लागेल. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणे टाळा आणि इतरांवर खर्च करणे टाळा. तुमचे डोळे इतके पाणीदार व तेजस्वी आहेत की तुमच्या प्रिय व्यक्तीची अख्खी रात्र त्यात उजळून जाईल. भागीदारीतील प्रकल्पातून सकारात्मक फळ मिळण्यापेक्षा अनेक प्रश्न निर्माण होतील. दुस-यांना आपल्या स्वभावाचा फायदा घेऊ दिल्याबद्दल तुम्ही स्वत:वर विशेष रागावलेले असाल. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेल्या जुन्या रोमँटिक दिवसांची आज पुन्हा एकदा उजळणी कराल.

उपाय :- गरम मसाले, सुक्का मेवा, मध, गुळाचा उपयोग जेवणामध्ये केल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील.