इचलकरंजी येथील हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथे नव्यानेच सुरु झालेल्या डॉ. पी. एस. पाटील मेडीकल फौंडेशनच्या केअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे कोविड काळातील अवघ्या सहा महिन्यात विविध आजारांवरील  777 शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या, अशी माहिती हॉस्पिटलच्या संस्थापिका डॉ. सौ. शुभांगी प्रदीप पाटील यांनी दिली.

Must Read

1) आयपीएल इतिहासात हा रेकॉर्ड करणारा पहिला खेळाडू

2) सेहवागची बुमराहबद्दलची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली

3) अखेर NDAचं बिहारवर वर्चस्व, तेजस्वीचं स्वप्न भंगलं!

4) IPL 2020 : आयपीएलची किंग मुंबईच...

5) Asusने लाँच केले 4 नवे लॅपटॉप

डॉ. पाटील म्हणाल्या, कोविड19 चा विचार करता लोकांची आर्थिक, सामाजिक अर्थव्यवस्था खालावली आहे . या कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यात  केअर हॉस्पिटलने हातभार लावला आहे. आज 80 टक्के लोकांना रोजगार नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. अशा काळात  गरजूंना मदतीचा हात देणे आवश्यक आहे. हे ओळखून या हॉस्पिटलमध्ये महात्मा जोतिबा फुले जीवन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनकल्याण आरोग्य योजना यांच्या माध्यमातून मोफत डिलिव्हरी व सिझर, गर्भाशय पिशवी काढणे, दुर्बिणीतून पित्ताशय, अ‍ॅपेडिक्स, हर्निया, मूळव्याध, भगेंदर, फिशर, डोळ्यातील मांस काढणे, 

सर्वप्रकारच्या हाडांची शस्त्रकिया, मुतखडा, प्रोस्टेट लहान मुलांचे वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया, नाक व डोळ्यांच्या शस्त्रक्रिया त्याचबरोबर दांताची कवळी बसवणे, दात काढणे, रूट कॅनॉल करणे आदी शस्त्रक्रीया करण्यात आल्या आहेत. कोविड काळात नॉन कोविड  1000 रुग्णांना बरे केले आहे. याठिकाणी उपलब्ध सुविधा व योजनांचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. शुभांगी पाटील यांनी केले आहे.