700-dead-30000-infecte-coronavirus

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना संकटाच्या काळात अमेरिकेत सर्वात मोठी निवडणूक आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या रॅलीत सहभागी होणं हजारो लोकांना महागात पडलं आहे. तब्बल 30,000 जणांना कोरोनाची लागण झाली असून 700 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. एका रिसर्चमधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. ट्रम्प यांच्या रॅलीमुळे आत्तापर्यंत 700 पेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावला आहे. 

Must Read

1) गृहमंत्रीसह खासदार नवनीत राणा यांची कोर्टानं केली निर्दोष मुक्तता

2) IPL 2020 : प्ले-ऑफमध्ये मुंबईशी भिडणार ही टीम

3) काजल अग्रवालचे नवऱ्यासोबतच रोमँटिक क्षण PHOTO

4) दुसरी लाट! COVID-19 रुग्णांच्या संख्येत या राज्याने महाराष्ट्रालाही टाकलं मागे

5) ‘मास्क’ का घातला नाही असं विचारताच गोळी झाडून हत्या

6) बुमराहची दिल्ली विरुद्ध रेकॉर्डब्रेक कामगिरी

डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारासाठी आत्तापर्यंत 18 रॅली निघाल्या आहेत. यामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांमध्ये 30 हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण (Corona infection) झाली. सॅनफोर्ड विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी याबाबत माहिती दिली आहे. रिसर्चमधून या रॅलीमध्ये सहभागी झाल्यामुळे अनेक लोकांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी काहींचा मृत्यूही झाला. ट्रम्प यांच्या 20 जून ते 22 सप्टेंबरदरम्यान झालेल्या रॅलीमधून ही माहिती समोर आली आहे.


ट्रम्प यांच्या रॅलीत हजारो लोक सहभागी झाले होते. तसेच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. रॅलीत सहभागी झालेल्या अनेकांनी मास्कही घातला नव्हता अशी माहिती आता समोर येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अमेरिकेसारखा प्रगत देशही कोरोना पुढे हतबल झाला आहे. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची आणि मृतांची संख्या ही सर्वाधिक आहे. एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यातून बरं होण्यासाठी साधारण एक आठवडा अथवा दहा दिवस लागतात.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याच दरम्यान एक अजब दावा केला आहे. "माझा मुलगा 15 मिनिटांत कोरोनामुक्त झाला" असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ट्रम्प यांनी यांनी आपला मुलगा बॅरोन 15 मिनिटांतच कोरोनामुक्त झाला असा दावा केला आहे. पेंसिलवेनियाच्या मार्टिन्सबर्गमध्ये एका निवडणूक रॅलीत आपल्या समर्थकांशी संवाद साधताना त्यांनी मुलाला झालेल्या कोरोनाबाबत माहिती दिली. काही दिवसांपूर्वी मेलानिया ट्रम्प आणि त्यांचा मुलगा बॅरोन ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली होती. व्हिस्कॉन्सिनमध्ये झालेल्या रॅलीतही ट्रम्प यांनी आपल्या मुलाच्या मजबूत रोगप्रतिकारक शक्तीचा उल्लेख केला. त्याच्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे 15 मिनिटांत तो कोरोनामुक्त झाला. त्यानंतर त्याने आपल्यासमोर शाळेत जायची इच्छाही व्यक्त केल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. 

ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी "मास्क लावणारे लोक नेहमीच कोरोनाग्रस्त असतात" असं वादग्रस्त विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. मियामी या ठिकाणी एनबीसी न्यूजचा एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात ट्रम्प यांनी हा दावा केला होता. 26 सप्टेंबरला व्हाइट हाऊसमध्ये एक कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात आलेल्या लोकांमुळे ट्रम्प यांना कोरोना झाल्याचं म्हटलं जातं आहे. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या बहुतांश लोकांनी मास्क लावले नव्हते. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर आता नेहमी मास्क घालणारे लोक कोरोनाग्रस्त असतात असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं.