कणेरीवाडी (ता. करवीर) येथील जय हिंद ढाब्याजवळ जेवणासाठी थांबलेल्या ट्रकच्या केबिनमधून ३३ लाख २८ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबवली. हा ट्रक  बकरी खरेदी करण्यासाठी बंगलुरू वरुन शिर्डीला निघाला होता. दरम्यान, घटनेची फिर्याद ट्रक मालक महंमद सिकंदर कुरेशी (वय ४२ रा. न्यू संतन डी. एस .  गुरुप्पन पल्लय. बी एस रोड, बेंगलुरू, कर्नाटक) यांनी गोकुळ शिरगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली आहे. 

Must Read

1) जिल्ह्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांचा आकडा पाचशेपार

2) जेलमधून सुटल्यानंतर अर्णब गोस्वामीचं शक्तीप्रदर्शन

3) शेअर बाजार तेजीतच; गुंतवणूक ‘करेक्शन’नंतर

4) HIV टाळण्यासाठी दररोज औषध घेण्याची नाही गरज पण...

5) रणबीर पहिल्यांदाच आलियासोबतच्या Relationship बाबत काय म्हणाला...

दरम्यान, आरोपींच्या तपासासाठी पथके रवाना झाली असून ट्रक थांबलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून त्याच्या आधारे तपासाची चक्रे गतिमान झाली आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, बंगळुरूहून शिर्डीला दोन ट्रक मधून नऊ खाटीक व्यवसायिक एकत्रित बकरी खरेदी करण्यासाठी निघाले होते. मोठ्या प्रमाणात बकरी खरेदी करण्यासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता असल्याने सर्व व्यापाऱ्यांनी आपली रक्कम एकत्रित केबिन मधील मागील सीटच्या खाली ठेवली होती. 

परंतु, मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास जेवणासाठी दोन्ही ट्रकमधील नऊ व्यक्ती थांबल्या व ट्रॅक्टची सर्व दारे, काचा व खिडक्या व्यवस्थित बंद करून जेवणासाठी गेले असता ट्रकच्या (क्र. के ए  ५१ ए.बी.३२०५) केबिन मधील मागच्या सीट खाली ठेवलेले  ३२ लाख २८ हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले.

घटनेची वर्दी मिळताच गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण घटनास्थळी दाखल झाले व या घटनेची ची माहिती तत्काळ वरिष्ठांना दिली. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे व डीवायएसपी प्रशांत अमृतकर हे बुधवारी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. यावेळी श्वानपथक पाचारण करण्यात आले होते. परंतु श्वान तेथेच घुटमळत राहिले. यासंदर्भात अद्याप कोणतेही धागेदोरे सापडले नाहित.