11-bathrooms-7-bedrooms-so-luxurious

आपल्या लाडक्या कलाकारांबद्दल जाणून घेण्याची प्रत्येक फॅनची इच्छा असते. चित्रपटांसह त्यांचं खासगी जीवन, त्यांच्या जीवनात घडणाऱ्या घडामोडी, राहणीमान इत्यादी गोष्टींची फॅन्सना उत्सुकता असते. कलाकारांचे बंगले, फार्महाऊस याबाबत फॅन्सच्या मनात कुतूहल असतं.

अशाच एका बड्या आणि स्टार कलाकाराच्या घराबाबत आपण जाणून घेणार आहोत. त्याला घर म्हणणं खरं तर अन्यायच होईल.

कारण  हा बंगला लॉस एंजिलिसमध्ये असून येथे देसी गर्ल प्रियंका चोप्रा (Priyanka Chopraतिच्या पती निक जोनासह राहते.

Must Read

1) कोल्हापुरात कडक बंदोबस्त,पोलिस सज्ज

2) जिल्ह्यात आज १९ रूग्णांची भर

3) मोठी बातमी : 'कोविडशील्ड' लशीमुळे गंभीर साइड-इफेक्ट; 5 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी

4) डिसेंबर महिन्यात १४ दिवस बँका बंद राहणार

5) कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ कायम

6) हार्दिक पांड्याने मध्येच हा निर्णय घेऊन सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का


 

एक पॅलेस अर्थात आलिशान महल किंवा राजवाडा म्हणावा असे प्रियंकाचे लॉस एंजिलिस मधील घर आहे. निक जोनासह लग्न केल्यानंतर हे कपल लॉस एंजेलिसमध्ये राहतात.

 

 

निकयंकाचे हे घर लक्झरी पॅलेसपेक्षा कमी नाही.

हे घर सुमारे 20,000 स्क्वेअर फूट मध्ये बांधण्यात आले आहे, ज्यात 7 खोल्या, 11 बाथरूम, चित्रपटगृह, बार, इनडोअर बास्केटबॉल कोर्ट, स्विमिंग पूल आहे. हे घर बाहेरून जितके सुंदर दिसते तितकेच आतूनही अतिशय आलिशान आहे.

 

 

निक आणि प्रियांकाच्या घराची रचना खूप वेगळी आहे. या भव्य बंगल्याची किंमत जवळपास 150 कोटी असल्याचे सांगण्यात येते.


विशेष म्हणून हा भव्य बंगला गर्दीच्या ठिकाणाहून खूप लांब आहे. त्याभोवती निसर्गाच्या सानिध्यात हा बंगला बांधण्यात आला आहे.

प्रियांकाच्या घरातून आरामात निसर्गाचे सुंदर दर्शनही घडते. प्रियांकाच्या घरात वाहनांसाठी भलेमोठे अंडरग्राउंड गॅरेजदेखील आहे.

सींटिग रूममध्ये मोठ मोठे सोफे आणि सुंदरसे झूमरही लावण्यात आले आहेत. तसेच सेंटरमध्ये मोठे टेबलही ठेवण्यात आले आहे.

तिच्याकडे आलिशान आणि महागड्या गाड्यांचं कलेक्शन तिच्याकडे आहे. तिच्या या बंगल्यावरूनच प्रियंकाची जीवनशैली किती आलिशान आहे याचा अंदाजही लावणेही शक्य होते.

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि पॉप गायक निक जोनास गेल्या वर्षी रेशीमगाठीत अडकले. १ डिसेंबर २०१८ रोजी हिंदू पद्धतीने तर २ डिसेंबर रोजी ख्रिश्चन पद्धतीने दोघांचं लग्न झालं. प्रियंका चोप्रा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. तिच्या आयुष्यातील आनंददायी क्षणांचे फोटोही ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच तिने इन्स्टाग्राम एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिने आई मधु चोप्रालाही टॅग केला आहे. हा फोटो शेअर करताना प्रियंकाने आईला 'नानी' आजी म्हटले आहे. या फोटोत प्रियंकासह तिचा पती निक आहेच. शिवाय या दोघांसह फोटोत डायनाही पाहायला मिळत आहे.