YouTube
कोरोनाने (corona) संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. या व्हायरसविषयी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकाराची माहिती प्रसिद्ध होत आहे. याविषयी आता सोशल मीडियापैकी (social media)महत्त्वाचा प्लॅटफॉर्म युट्युबने (YouTube) मोठा निर्णय घेतला आहे. युट्युबने कोरोना संदर्भातील चुकीची माहिती देणारे व्हिडिओ हटवण्याचा निर्णय घेतला आहे. 

नक्की वाचा 

1) हिमालयात फुलला दुर्मिळ ब्रह्मकमळांचा मळा

2) एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यावरून शिवसेनेमध्ये नाराजी       का?

3) देशाला पहिला ऑस्करचा मान पटकावून देणाऱ्या मराठमोळ्या भानू अथैय्या यांचं निधन

 4)  कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

5) नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांची आॅनलाइन पायाभूत चाचणी


त्याचबरोबर कोरोनाच्या लशीबद्दल चुकीची माहिती देणारे व्हिडिओ हटवण्याचा निर्णय घेतला आहे. युट्युबने कोरोनाच्या लशी संदर्भात कडक भूमिका घेतली असून चुकीची माहिती आणि चुकीची माहिती देणारे व्हिडीओ (social media) हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात  रॉयटर्सला यूट्यूबच्या प्रवक्त्याने माहिती देताना सांगितले, कोरोना संदर्भात माहिती देणारे आणि समाजप्रबोधन करणारे व्हिडीओ ठेवले जाणार आहेत. पण गैरसमज आणि चुकीची माहिती पसरवणारे व्हिडीओ हटवले जाणार आहेत. चुकीची माहिती देणारे व्हिडीओ याआधीच युट्युबने  (YouTube) हटवले आहेत. त्यानंतर आता लसी संदर्भात चुकीची माहिती देणारे आणि गैरसमज पसरवणारे व्हिडीओ देखील हटवले जाणार आहेत. 

जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि स्थानिक प्रशासनाने सांगितलेल्या महितीच्या विपरीत माहिती एखाद्या व्हिडिओमधून दाखवण्यात येत असल्यास त्या व्हिडिओवर तत्काळ बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती युट्युबने दिली आहे.

युट्युबने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे, ही लस लोकांचा बळी घेईल किंवा वंध्यत्वाला कारणीभूत ठरेल, किंवा ही लस घेणाऱ्यांच्या शरीरांत मायक्रो चिप आपोआप बसवली जाईल अशा अफवा काही व्हिडिओंमधून पसरवल्या जात आहेत. यामुळे या व्हिडिओंवर बंदी घालण्यात येणार आहे.

आल्याची माहिती दिली आहे. याचबरोबर तयार होणाऱ्या लसी संदर्भातदेखील युट्युबवरील काही व्हिडिओमधून चुकीची माहिती आणि गैरसमज पसरवला जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरत असल्याचा अंदाज देखील युट्युबने व्यक्त केला आहे. जगभरात विविध देश आणि संशोधक कोरोना संदर्भातील लस तयार करण्याचे काम करत आहेत. भारतातदेखील अनेक संस्था या लसीवर काम करत आहेत. युट्युबने आतापर्यंत असे जवळपास 2 लाख व्हिडीओ हटवले असून अजूनदेखील हे व्हिडीओ हटवण्याचे काम सुरु असल्याचे युट्युबने सांगितले आहे.

दरम्यान,  जागतिक आरोग्य संघटनेचे डिजिटल माध्यमांचे काम पाहणारे अँडी पॅटिन्सन यांनी रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, संघटना प्रत्येक आठवड्याला यासंदर्भात युट्युबबरोबर चर्चा करत असते. यामुळे यूट्यूबच्या या निर्णयाचे संघटना स्वागत करत असून यामुळे आम्हाला काम करण्यास प्रोत्साहन मिळत आहे.