Main Featured

शहापूर इथून युवक बेपत्ताइचलकरंजी येथील कारंडे मळा,गल्ली नं 1 शहापूर या भागात राहत असलेला 19 वर्षीय युवक उमेश किसन सागावकर हा बेपत्ता झाल्याची फिर्याद त्याचे वडिल किसन सागावकर यांनी शहापूर पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे.अधिक माहिती अशी की,गल्ली नं 1 इथे राहत असलेला उमेश  हा कामावर जातो असे सांगून घराबाहेर पडला ते आजअखेर आला नसून तो बेपत्ता असल्याची  फिर्याद त्याच्या वडिलांनी दिली आहे.

Must Read

1) कोल्हापुरी! ऑनलाईन दुकानात आता घरबसल्या मिळणार अस्सल कोल्हापुरी चप्पल

2) महाविकासआघाडी सरकार हे बिघाडी सरकार आहे : हर्षवर्धन पाटील

3) प्रेग्नन्सीची न्यूज दिल्यानंतर अनिता हसनंदानी शेअर केले असे PHOTO

4) शुल्लक कारणावरुन रिक्षाचालकाला मारहाण; VIDEO

5) डोक्यात लोखंडी रॉडने वार करत पत्नीला संपवलं

19 वर्षीय उमेश हा रंगाने काळासावळा असून उंची पाच फूट पाच इंच आहे.केस काळे आहेत.मध्यम बांधा आहे.जाताना त्याच्या अंगावर लाल रंगाचा हाफ शर्ट व काळी पॅन्ट होती.अकरावी पर्यंत त्याचे शिक्षण झाले असून मराठी व हिंदी बोलता येते.त्याच्या हाताच्या पंजावर व डोकीला पाठीमागच्या बाजूस जुन्या जखमेचा व्रण आहे.अशा वर्णनाचा कोणी युवक आढळल्यास संबंधितांनी शहापूर पोलिस स्टेशनला कळवावे असे पो.हे.काॅ.एम.एस.कोरे यांनी कळविले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.