xiaomi-to-host-diwali-with-mi-sale

शाओमी (Xiaomi) कंपनीने सणासुदीनिमित्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक धमाकेदार सेल आणला आहे. Diwali with Mi असं या सेलचं नाव आहे. १६ ऑक्टोबर ते २१ ऑक्टरपर्यंत हा सेल सुरु राहणार आहे. दररोज दुपारी ४ वाजता फ्लॅश सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. हा फ्लॅश सेल शाओमी कंपनीच्या संकेतस्थळावर तसेच फ्लिपकार्ट (Flipkartआणि अॅमेझॉन (Amazonच्या संकेतस्थळावर असेल. या सेलमध्ये फक्त एक रुपयांत स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

Advertise

नक्की वाचा 

1) हिमालयात फुलला दुर्मिळ ब्रह्मकमळांचा मळा

2) एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यावरून शिवसेनेमध्ये नाराजी       का?

3) देशाला पहिला ऑस्करचा मान पटकावून देणाऱ्या मराठमोळ्या भानू अथैय्या यांचं निधन

 4)  कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

5) नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांची आॅनलाइन पायाभूत चाचणी

शाओमी कंपनीने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार एक्सिस बँक (axis bank net banking login) आणि बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) बँकेच्या क्रेडिट कार्ड असणाऱ्यांना एक हजार रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. Diwali with Mi या सेलमध्ये ग्राहकांना अनेक आकर्षक ऑफर देण्यात आल्या आहेत. शाओमीचं अधिकृत संकेतस्थळ Mi.com वर Diwali with Mi हा सेल आयोजित करण्यात आला आहे. या सेलमध्ये अनेक उपकरणांवर ८० टक्के सवलत मिळेल. यात Mi Pocket स्पीकर, Mi Travel बॅकपॅक यांसारख्या प्रोडक्ट्सचाही समावेश आहे. सेल दरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत PICK N’ CHOOSE डील्स आयोजित केली आहे.

या सेलमध्ये नुकताच रिलिज झालेला ५४,९९९ रुपयांचा Mi 10 हा स्मार्टफोन ४४,९९९ रुपयांत खरेदी करता येणार आहे. तसेच Redmi Note 9 Pro Max , Redmi Note 8 , Redmi 9 Prime , Redmi Note 9 आणि Redmi Note 9 Pro या स्मार्टफोनवर एक हजार रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. तसेच Redmi 8A dual वर २०० रुपयांची सूट मिळणार आहे.

स्मार्टफोन्सशिवाय इतर स्मार्ट प्रॉडक्ट्सवरही भरमसाठ सूट देण्यात आली आहे. Mi Smart Band 4 वर ३०० रुपयांची सूट देण्यात आली आहे. या डिस्काउंटनंतर Mi Smart Band 4 ची किंमत १९९९ इतकी झाली आहे. Mi TV 4A Pro (43) वर ५०० रुपयांची सूट आहे. तर Mi TV 4X (50) वर 1,000 रुपयांचा डिस्काउंट देण्यात आला आहे.