whatsapp features




whatsapp features
- तुमचं एखादं महत्वाचं संभाषण तुम्हाला परत ऐकायचं आहे. पण ते संभाषण व्हॉट्सअ‍ॅपने कॉल (WhatsApp Call) वरुन झाल्यामुळे तुम्हाला मिळालं नाही? आता अशी वेळ पुन्हा येणार नाही. कारण, आता तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपचे कॉलही रेकॉर्ड करणं सहज शक्य आहे. अ‍ँड्रॉईड (Android) आणि आयफोन (Iphone) युझर्सना व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड शक्य आहे. व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करताना ज्या व्यक्तीचा कॉल तुम्ही रेकॉर्ड करत आहात. त्याला याची पूर्वकल्पना देणं आवश्यक आहे.

Must Read

1) उद्योग क्षेत्रातील कामगारांना वेतनवाढ मिळण्याची शक्यता

2) आमिर खानच्या मुलीने दिली इन्स्टाग्रामवर धमकी...

3) अ‍ॅमेझॉन अन् फ्लिपकार्टला मनसेचा इशारा

4) लग्नाचं आमिष दाखवून रेपचा आरोप; मिथुन चक्रवर्ती यांच्या मुलासह पत्नीवर गुन्हा

5) मंत्रालय, स्वारगेट, कोल्हापूर, अलिबागसाठी ५० शिवशाही

6) 'वर्क फ्रॉम होम'मुळे सायबर गुन्ह्यात मोठी वाढ

अँड्रॉईड युझर्ससाठी कॉल रेकॉर्ड करण्याची पद्धत (whatsapp features)

अ‍ँड्रॉईड युझर्सना (android users) व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करायचा असेल तर त्यांना क्यूब कॉल अ‍ॅप डाऊनलोड करावं लागेल. क्यूब कॉल रेकॉर्डर अ‍ॅप सुरू करुन त्याच्या सेटिंग्जमध्ये जावं लागेल आणि वॉईस कॉल यामध्ये जाऊन Force Voip वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीचा व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड  (WhatsApp Call) करायचा आहे त्याला व्हॉट्सअ‍ॅपवरुन कॉल कॉल करायचा आहे. यावेळी तुम्हाला क्यूब कॉल रेकॉर्डर सुरू असलेला दिसेल. याचा अर्थ तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे. पण या सेटिंग्ज करुन सुद्धा तुमचा कॉल रेकॉर्ड होत नसेल तर तुमच्या फोनमध्येच ही सेवा उपलब्ध नाही हे समजून घ्या.

आयफोन युझर्सनी कशाप्रकारे कॉल रेकॉर्ड करावा?

तुम्ही आयफोन युझर (iphone users)असाल आणि तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करायचा असेल तर तुम्हाला लाईटनिंग केबलने MaC कनेक्ट करावा लागेल. त्यानंतर तुमच्या आयफोनवर Trust This Computer असा पर्याय येईल. तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला Quick Time हा पर्याय सुरू करावा लागेल. त्याध्ये फाईल सेक्शनमध्ये जाऊन न्यू ऑडिओ रेकॉर्डिंग हा पर्याय निवडावा लागेल.

रेकॉर्ड बटणाच्या खाली दाखवणारा अ‍ॅरो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. आणि आयफोन हा पर्याय निवडायचा आहे. यानंतर क्विक टाईममध्ये जाऊन रेकॉर्ड बटणावर क्लिक करायचं आहे. आणि तुमचा व्हॉट्सअ‍ॅप कॉल सुरू करायचा आहे. त्यानंतर युझर आयकॉन अ‍ॅड करायचा आहे. कॉलरील संभाषण सुरू झाल्यावर रेकॉर्डिंग सुरू होईल. संभाषण संपल्यावर रेकॉर्डिंग बंद करायचं आहे आणि रेकॉर्डेड फाईलला मॅकमध्ये सेव्ह करायचं आहे.