Entertainment news- ग्लोबल स्टार  प्रियंका चोप्रा लवकरच राजकुमार रावसोबत ‘द व्हाईट टायगर’या सिनेमात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज झाला होता. आता या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. सोशल मीडियावर (Netflix) या ट्रेलरने धुमाकूळ घातला आहे. 

प्रियंकाने (priyanka chopra) चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला. ट्रेलरमध्ये राजकुमार व प्रियंका एनआरआय कपलच्या रूपात आहेत आणि आदर्श गौरव त्यांच्या ड्रायव्हरच्या भूमिकेत आहेत. प्रियंका व राजकुमार यांच्याशिवाय प्रत्येक सीनमध्ये आदर्श गौरवने धमाकेदार परफॉर्मन्स दिला आहे.

Must Read

1) सांगलीत आज आपत्ती व्यवस्थापन कक्षासह तीन कामांचे लोकार्पण

2) विराट कोहलीने सांगितलं आरसीबीच्या हरण्यामागचं कारण

3) लवकरच पुरुषांसाठीही गर्भनिरोधक औषध

4) सरकारने लागू केली आरोग्य विम्याची नवी योजना

2) IPL 2020 : बुमराहचा स्पेशल रेकॉर्ड

प्रियंकाने (priyanka chopra) यात पिंकी नामक व्यक्तिरेखा साकारली आहे तर राजकुमारने अशोक नावाचे पात्र जिवंत केले आहे. आदर्श गौरव बलराम नामक ड्रायव्हरची भूमिका साकारली आहे.  ड्रायव्हर बलरामला श्रीमंत व्हायचे असते. आधी तो यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. मात्र एका वळणावर लवकरात लवकर पैसा कमवण्याच्या नादात तो चुकीच्या मागार्ला लागतो आणि या चित्रपटाची संपूर्ण कथा वेगळ्या वळणावर जाते. (Entertainment news)‘द व्हाईट टायगर’ हा सिनेमा नेटफ्लिक्ससोबतच (Netflix) चित्रपटगृहांमध्येही रिलीज होणार आहे. ‘द व्हाईट टायगर’ हा सिनेमा अरविंद अडिगा यांच्या ‘द व्हाईट टायगर’ या पुस्तकावर आधारित आहे. रमिन बहरानी हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत. या पहिल्याच कादंबरीसाठी अरविंद अडिगा यांना बुकर पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

नेटफ्लिक्स (Netflix) मुकूल देवरा यांच्यासोबत मिळून हा सिनेमा दिग्दर्शित करत आहे. प्रियंकाही एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर म्हणून या सिनेमाशी जुळलेली आहे. गेल्यावर्षीच या सिनेमाचे शूटींग पूर्ण झाले होते. शूटींगच्या अखेरच्या दिवसाचा फोटोही प्रियंकाने शेअर केला होता.

ट्रेलरमध्ये आदर्श गौरवच्या अ‍ॅक्टिंगने सर्वांनाच प्रभावित केले आहे. आदर्श गौरव हे नाव आधी तुम्ही ऐकले असते. शाहरूख खानचा ‘माय नेम इज खान’ हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल तर त्यातील छोटा शाहरूख तुम्हाला आठवत असेल. आदर्श गौरव यानेच ती भूमिका साकारली होती. 

गेल्या 10 वर्षांत आदर्श गौरवने आपल्या अ‍ॅक्टिंगवर प्रचंड कष्ट घेतलेत. द व्हाईट टायगरचा ट्रेलर पाहिल्यानंतर ते पदोपदी जाणवते. खरे सांगायचे तर या सिनेमात राजकुमार व प्रियंका नाही तर आदर्श गौरव मुख्य भूमिकेत  आहे. तोच या सिनेमाचा खरा हिरो आहे. याआधी मॉम, रूख या सिनेमात शिवाय लैला, हॉस्टल डेज या वेबसीरिजमध्ये तो दिसला आहे.