west-bengal-police-lathi-charge-tear-gas

indian politics latest news : विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असतानाच स्थानिक भाजप नेत्याची क्रूर हत्या झाल्याने पश्चिम बंगालमध्ये राजकीय संघर्ष पेटला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjeeयांच्या विरोधा भाजपने कोलकात्यात आंदोलन केलं. त्या वेळी पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना पांगवण्यासाठी जोरदार लाठीमार केला. त्यानंतर आंदोलन हिंस्त्र बनलं. पोलिसांनी निर्दयीपणे लाठीमार केल्याचा एक VIDEO आता समोर आला आहे. ज्येष्ठ, वयोवृद्ध आंदोलक आणि महिला कार्यकर्त्यांनाही पोलीस धरून मारताना या VIDEO मध्ये दिसतात.

Advertise

Must Read

1) केंद्रीय मंत्री नितिन गडकरींचे खासदार डॉ. कोल्हे यांना पत्र, कारण...

2) ...तर फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचा मार्ग मोकळा

3) चीनला भारी किंमत चुकवावी लागेल; ट्रम्प यांचं मोठं विधान

4) राज्यात चालवणार ५ विशेष रेल्वे; मध्य रेल्वेचा निर्णय

5) MPSCच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय

बंगालच्या  24 परगणा जिल्ह्यातले कार्यकर्ते आणि नगरसेवक मनीष शुक्ला यांच्या हत्येच्या निषेधार्थ भाजपने कोलकाता इथे हावडा मैदानात निदर्शनं केली. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी बळाचा वापर केला. प्रथम पाण्याचे फवारे मारून आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर कोलकाता पोलिसांनी जोरदार लाठीहल्ला सुरू केला. आंदोलकांकडून दगडफेकही झाली. पोलिसांनी अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या. या संपूर्ण हिंसक आंदोलनाचे VIDEO आता पुढे येत आहेत.

पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकी (Assembly electionsचे वारे जोरानं वाहात आहेत. बंगाली निवडणुकीत राजकीय हिंसा नवी नाही. पण या वेळी निवडणुकांची घोषणा होताच भाजप कार्यकर्त्याची हत्या झाल्याने भाजपने थेट सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर आरोप केले आहेत. ममता बॅनर्जी यांनी मात्र हा भाजपचा राजकीय खेळ असल्याचं सांगत अंतर्गत वादातून ही क्रूर हत्या झाल्याचं म्हटलं आहे.

भाजपने नाबन्ना चालो (nabanna chalo) नावाने निदर्शन रॅली आयोजित केली होती. हावडा मैदानावर भाजपने  जोरदार ममता विरधी घोषणाबाजी केली.   युवा मोर्चाच्या या निषेध रॅलीला हिंसक वळण लागलं. कोलकाता पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी बळाचा वापर केला. सुरुवातीला अश्रुधूर, पाण्याचे फवारे मारले आणि नंतर तुफान लाठीमारही केला. जमावाने दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवत कडक कारवाई सुरू ठेवली. भाजपने केलेल्या निदर्शनांमध्ये कैलास विजयवर्गीय देखील सहभागी झाले होते. याशिवाय अनेक वयोवृद्ध कार्यकर्ते आणि महिलाही आंदोलकांमध्ये होत्या. त्या सर्वांवर पोलिसांनी निर्दयी लाठीमार केला.

कोलकात्यात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. राजकीय तणाव वाढत जाणार, असं या VIDEO मधून दिसतं.