virat-kohali-plays-abd-shots-watch-video

IPL LIVE चेन्नई सुपर किंग्ज 

Advertise

Chennai Super Kingsविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने 37 धावांनी विजय नोंदवला. स्पर्धेतील चौथ्य विजयासह बंगळुरुच्या खात्यात आठ गुण जमा झाले असून गुणतालिकेत ते चौथ्या स्थानावर पोहचले आहेत. अवघ्या 13 धावा असताना फिंचच्या रुपात बंगळुरुला पहिला धक्का बसला. त्यानंतर युवा देवदत्त पदिक्कलही माघारी फिरला. 

चेन्नई विरुद्धच्या सामन्यात शार्दुल ठाकुरने 360 अंशात खेळणाऱ्या एबीला खातेही उघडू दिले नाही. पण, त्याच्या भात्यातील फटकेबाजीचा अंदाज कोहलीच्या भात्यातून पाहायला मिळाला. कोहलीने 52 चेंडूत 90 धावांची नाबाद खेळी केली. यात त्याने 4 चौकार आणि 4 षटकार खेचले. 

डावाच्या अखेरच्या षटकात ब्रावोच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने एबी स्ट्राईल चौकार खेचल्याचे पाहायला मिळाले. ब्रावो घेऊन आलेल्या  अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याने ब्रावोला चौकार लगावला. कोहलीनं या षटकात शिवम दुबेच्या साथीनं 14 धावा केल्या.