Urmila Matondkar
politics news-
प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar)यांची विधानपरिषदेवर नियुक्ती होण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त कोट्यातून शिवसेनेच्या तिकीटावर मातोंडकर यांना आमदारकी मिळण्याची चिन्हं आहेत. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन उर्मिला मातोंडकर यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. 

उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांची विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त जागेवर शिवसेनेकडून नियुक्ती होण्याची शक्यता आहे. उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसच्या तिकीटावर गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा भाजप नेते गोपाळ शेट्टी यांच्याकडून पराभव झाला होता. (politics news)

Must Read

1) सांगलीत आज आपत्ती व्यवस्थापन कक्षासह तीन कामांचे लोकार्पण

2) विराट कोहलीने सांगितलं आरसीबीच्या हरण्यामागचं कारण

3) लवकरच पुरुषांसाठीही गर्भनिरोधक औषध

4) सरकारने लागू केली आरोग्य विम्याची नवी योजना

5) IPL 2020 : बुमराहचा स्पेशल रेकॉर्ड

काही महिन्यांपूर्वी उर्मिला यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. त्यानंतर शिवसेनेशी त्यांची जवळीक वाढली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन उर्मिला मातोंडकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर शिवसेनेकडून उर्मिला यांची विधीमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वाढली आहे.

काँग्रेसवर आगपाखड करुन सोडचिठ्ठी

मुंबई काँग्रेसच्या (congress) भल्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी अंतर्गत राजकारण सोडवण्यासाठी काँग्रेसने माझ्या प्रतिमेचा गैरवापर करुन घेतला, असा दावा करत उर्मिला मातोंडकरने अवघ्या सहा महिन्यात पक्षाला सो़डचिठ्ठी दिली होती.

45 वर्षीय उर्मिला मातोंडकरने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. उर्मिलाचे रंगीला, प्यार तुने क्या किया, भूत, कौन यासारखे असंख्य चित्रपट गाजले आहेत. उर्मिलाच्या डान्सचेही चाहते आहेत. तिने काही रिअॅलिटी शोंचं परीक्षणही केलं आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून ती बॉलिवूडमध्ये फारशी दिसली नव्हती. काही वर्षांपूर्वी 'आजोबा' या मराठी चित्रपटात ती झळकली.

राजकारणातून (politics)आपली सेकंड इनिंग सुरु करणाऱ्या उर्मिलाने अकाली राजकीय एक्झिट घेतल्याची चर्चा होती. मात्र तिने शिवसेनेत प्रवेश केल्यास ही 'मराठी मुलगी' मराठी माणसाच्या अस्मितेसाठी काम करेल, अशी अपेक्षा चाहते व्यक्त करत आहेत.