urmila-matondkar-vs-kangana-

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर Urmila Matondkar शिवसेनेत येणार म्हटल्यावर बरंच काही बदलणार आहे. तुमची कंगना तर आमची उर्मिला म्हणत शिवसेनेने जोर का झटका धीरे से दिला आहे. बघुया उर्मिलामुळे शिवसेनेत काय बदलेल. मटकाके चल दिए हमको, झटका हुआ है क्यूं तुमको, असेच कदाचित उर्मिला आणि शिवसेना सध्या म्हणत असतील. 

तुमची कंगना तर आमची उर्मिला असं म्हणत शिवसेनेनं हा जोर का झटका धीरे से लगेची तयारी केलेली दिसत आहे. विधानपरिषदेत शिवसेनेकडून उर्मिलाला पाठवायचा प्लॅन आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांचे उर्मिलाशी फोनवरुन बोलणेही झाले आहे. अर्थात शिवसेनेचे नेते तसे काही नाही, असं सांगत आहेत.

उर्मिला मातोंडकर यांच्याबर शिवसैनिक म्हणून आम्हाला काहीही माहिती नाही. मात्र, पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे जो काही निर्णय घेत असतील तर विचार करुन घेतला असले, अशी मोजकीच प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांनी दिली.

विधानपरिषदेच्या नावांबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. त्यामुळे अनिल परब असे बोलणे स्वाभाविक आहे. पण पडद्यामागे हालचाली सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. उर्मिलाने शिवबंधन बांधलं तर शिवसेनेला तसा फायदाच आहे

या आहेत जमेच्या बाजू 

- चांगली अभिनेत्री शिवसेनेकडे येईल
- शिवसेनेला तरुण, ग्लॅमरस आणि बुद्धिमान चेहरा मिळेल
उर्मिलाचं मराठी, हिंदी आणि इंग्रजी तीनही भाषांमध्ये प्रभुत्व असल्याचा फायदा होईल
- विशेषतः माध्यमांमध्ये शिवसेनेची बाजू मांडण्यासाठी उत्तम प्रवक्ता मिळेल
 
आणखी महत्त्वाचे म्हणजे तुमची कंगना तर आमची उर्मिला, असा धारदार बाण शिवसेनेला भात्यातून काढता येईल. कंगना रानौतने उर्मिलाला सॉफ्ट पॉर्नस्टार म्हटले होते. त्यावेळी संयमही प्रतिशोधको काबू करने का उपाय होता है, असे उर्मिलाने सुनावले होते. त्याहीवेळी दोघींमधल्या युद्धाची चर्चा रंगली होती. भविष्यकाळात हा सामना रंगतदार होऊ शकेल अशीच चर्चा सध्या राजकीय वातावरणात सुरु झाली आहे.