uk-new-sex-ban-restricts-couples

युनायटेड किंग्डम (United Kingdomमध्ये कोरोना व्हायरसचा कहर निर्माण झाला आहे. अनेक उपाययोजना करूनही कोरोनाचा कहर थांबत नाही. अशा परिस्थितीत सरकारने लॉकडाऊनचा नियम लावला. मात्र याबरोबरच आता सरकारने 'सेक्स बंदी' आणली आहे. याची जोरदार सोशल मीडियावर चर्चा होतेय. 

पंतप्रधान बोरिस जॉनसन  (Prime Minister Boris Johnson) यांच्या प्रवक्ताने म्हटलंय की, 'काही हॉटस्पॉटमध्ये कपल्स आणि सिंगल राहणाऱ्या लोकांना भेटण्याची परवानगी दिली आहे. मात्र त्यांनी सोशल डिस्टेन्सिंगचे सर्व नियम सांभाळावे लागतील. या भेटीत ते एकमेकांना स्पर्श पण करू शकत नाहीत. 

Advertise

Must Read

1) कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन आता सोशल मिडीयावर

2) राज्यपालांचा पॉलिटीकल एजंटसारखा वापर; राऊतांचा टोला

3) प्रत्येक स्त्रीमध्ये आहे 'दुर्गा'; लक्षवेधी रुपातील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?

4) WhatsApp मध्ये समस्या आल्यास आता तक्रार थेट कंपनीकडे करा

5) न्यूडल्स तयार करता करता तरुणीनं केला भन्नाट डान्स, VIDEO पाहून व्हाल हैराण

इंग्लंड (Englandची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या सध्या करोना संसर्गाच्या दृष्टीने धोकादायकच नव्हे, तर अति धोकादायक झोनमध्ये आहे. त्यामुळे काहींच्या मते पुढच्या काही महिन्यांमध्ये सेक्स हा करोनाप्रसाराला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरू शकतो. ते रोखण्यासाठी हा नवीन नियम करण्यात आला असून, त्यानुसार एकत्र राहणारे आणि त्याच ‘सपोर्ट बबल’मध्ये राहणारे लोक लॉकडाऊनच्या काळात एकमेकांना एकांतात भेटू शकतात. 

कोरोनाच्या काळात तीन भाग करण्यात आले आहेत. टिअर १, टिअर २, टिअर ३. यामधील टिअर २ आणि टिअर ३ मध्ये हाय रिस्क आणि सर्वाधिक रिस्कचा समावेश आहे. टिअर १ मध्ये मीडिअम रिस्क असणाऱ्या भागात कव्हर करणार आहेत. नवीन नियमानुसार, हाय रिस्क आणि सर्वाधिक रिस्क असणाऱ्या विभागातील लोकांना एकमेकांना भेटण्यासाठी पूर्णपणे बंदी आहे. एवढंच नव्हे तर कपल्सच्या कॅच्युअल सेक्सवर देखील बंदी ठेवण्यात आली आहे. यामागील महत्वाचा मुद्दा की कपल्समधील ट्रान्समिशनला रोखणं असं आहे.