trp-scam-republic-india

पैसे देऊन टीआरपी (target rating point) मिळवण्यासाठी सक्रिय असलेल्या दोन मराठी चॅनेलच्या मालकांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत घेऊन ‘फॉल्स टीआरपी रॅकेट’ सुरू असल्याचे सांगितले आहे. त्यांनी रिपब्लिक टीव्हीसह तीन वाहिन्यांचे नाव घेतले आहेत.

मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग म्हणाले की, खोट्या टीआरपीचे रॅकेट रोखण्यासाठी आम्ही तपास करीत आहोत. फॉरेन्सिक तज्ञांची मदत घेतली जात आहे. पकडलेल्या आरोपींच्या आधारे पुढील कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. या रॅकेटमध्ये फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा (Box cinema) या दोन वाहिन्यांचाही समावेश आहे. या वाहिन्यांच्या मालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या सीआययुच्या पथकाने या बनावट टीआरपीचे रॅकेटचा भांडाफोड केला आहे.

Advertise

Must Read

1) केंद्रीय मंत्री नितिन गडकरींचे खासदार डॉ. कोल्हे यांना पत्र, कारण...

2) ...तर फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचा मार्ग मोकळा

3) चीनला भारी किंमत चुकवावी लागेल; ट्रम्प यांचं मोठं विधान

4) राज्यात चालवणार ५ विशेष रेल्वे; मध्य रेल्वेचा निर्णय

5) MPSCच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय


पोलिस आयुक्तांनी सांगितले की, रिपब्लिक टीव्हीमध्ये काम करणारे लोक, प्रमोटर आणि डायरेक्टर हे देखील यात सहभागी असल्याची शक्यता आहे. पुढील तपास सुरु असून ज्यांनी या वाहिन्यांना जाहिरात दिली त्यांचीही चौकशी केली जात असल्याचे ते म्हणाले.

असे सुरु होते टीआरपी रॅकेट?

पोलीस आयुक्त म्हणाले, बनावट टीआरपीचे मोठे रॅकेट हाती लागले आहे. टेलिव्हिजन जाहिरात इंडस्ट्री सुमारे 30 ते 40 हजार कोटी रुपयांची आहे. टीआरपी दराच्या आधारे जाहिरात दर ठरविला जातो. टीआरपीमध्ये बदल झाल्यास त्याचा परिणाम महसुलावर होतो. याचा काही लोकांना फायदा होतो तर काही लोकांना तोटा होतो, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, टीआरपी मोजण्यासाठी बीएआरसी ही एक संस्था आहे. ते वेगवेगळ्या शहरात बॅरोमीटर लावतात, देशात सुमारे 30 हजार बॅरोमीटर स्थापित केले गेले आहेत. मुंबईत सुमारे 10 हजार बॅरोमीटर बसविण्यात आले आहेत. 

बॅरोमीटर बसवण्याचे काम मुंबईतील हंसा नावाच्या संस्थेला देण्यात आले होते. तपासादरम्यान हंसाबरोबर काम करणारे काही जुने कामगार टेलिव्हिजन वाहिनीवर माहिती शेअर करत होते. हंसाच्या माजी कामगार लोकांना सांगणायचे की, आपण घरी असाल किंवा नसाल, चॅनेल चालू ठेवा. यामध्ये जे अशिक्षित आहेत, त्यांच्या घरी देखील इंग्रजी चॅनेल वापरले जात होते. दरम्यान हंसाच्या माजी कामगारांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.