share market


share market- आठवड्याची सुरुवात दणक्यात करणारे सेन्सेक्स आणि निफ्टी एका मोठ्या संधीची वाट पाहत आहेत, असा अंदाज शेअर बाजार विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. सरकारने अनलॉक ५ जाहीर केला असून त्यातून अर्थव्यवस्था आणखी खुली केली जाणार आहे. त्यामुळे या तिमाहीत अर्थचक्राला गती मिळेल, अशी शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर सेन्सेक्सने (senex)४०० अंकांची झेप घेतली आहे. तर निफ्टी (nifty)११६ अंकांनी वधारला आहे.


सलग दोन सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये किंचित वाढ झाली होती.निफ्टी ११३०० अंकांवर स्थिरावला होता. अमेरिका (america)आणि आशियातील शेअर बाजारात (share market)तेजी असल्याने आज भारतीय बाजार देखील त्याच दिशेने व्यवहार करतील, असा अंदाज आहे. आज बाजार केमकॉन आणि कॅम्स या दोन कंपन्यांच्या शेअरची नोंदणी होणार आहे. दरम्यान मंगळवारी ग्रे मार्केट दोन्ही कंपन्यांचे शेअर १५ टक्क्यांनी घसरले होते.

MUST READ


आज बाजार उघडताच सेन्सेक्स ४१८ अंकांनी वधारला असून तो सध्या ३८५२२ अंकांवर आहे. तर निफ्टी १२७ अंकांनी वधारून ११३७४ अंकांवर आहे. बाजारात (share market)पीव्हीआर, आयनॉक्स या शेअरमध्ये अपेक्षितपणे १० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. अनलॉक-५ मध्ये सिनेमा गृहे ५० टक्के क्षमतेसह सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे आज या शेअरला मागणी दिसून आली.

टाटा मोटर्स , बजाज ऑटो, बजाज फायनान्स, ऍक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, एचसीएल टेक, टायटन, एचयूएल हे शेअर वधारले आहेत. एनटीपीसी, नेस्ले आणि ओएनजीसी या शेअरमध्ये घसरण झाली आहे.