Gold Silver Rates todayआंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोन्याचांदीच्या किंमतीत (gold silver rate today) तेजी पाहायला मिळाली. मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (Multi-Commodity Exchange) वर  डिसेंबरसाठीच्या सोन्याची वायदे किंमत (Gold Future Rate) 0.8 टक्के ने वाढून  50,584 रुपये प्रति तोळावर पोहोचली आहे. तर चांदीची वायदे किंमत (Silver Future Rate) देखील 1.8 टक्क्याने वाढून 61,605 रुपये प्रति किलोग्राम झाली आहे. याआधीच्या सत्रात सोन्यामध्ये 142 रुपये आणि चांदीमध्ये 0.17 टक्के अशी किरकोळ वाढ झाली होती.

Must Read

1) मराठा संघटनांकडून उद्याचा महाराष्ट्र बंद मागे

2) आता येतंय Green Ration Card

3) टीव्ही टीआरपी रॅकेटचा पर्दाफाश; ‘रिपब्लिक’सह ३ चॅनल्सची चलाखी

4) क्रीडा विभागातून कुस्तीपटू बबीता फोगटचा राजीनामा

5) COVID-19 : मॉडर्ना कंपनीने कोरोना लशीसंदर्भात घेतला मोठा निर्णय


ऑगस्टमध्ये सर्वोच्च स्तरावर होते सोन्याचे दर

यावर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. ऑगस्टमध्ये एक तोळा सोन्याचे भाव 56,200 रुपये तर चांदीचे भाव प्रति किलो 80000 च्या जवळपास होते. मात्र सप्टेंबर महिन्यात दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये घसरण झाली आहे. यानुसार सोन्याचे दर जवळपास 6000 रुपयांनी कमी झाले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  (Donald Trump)यांनी कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता नवीन मदत पॅकेजची घोषणा केल्यानंतर सोन्याच्या किंमतीत सकारात्मकता वाढली आहे. राष्ट्राध्यक्षांनी असे म्हटले आहे की या पॅकेज संदर्भात काँग्रेसशी चर्चा सुरू आहे. त्याचप्रमाणे कमजोर डॉलरमुळे देखील सोन्याचे दर वाढण्यास मदत झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 1,898 डॉलर प्रति औंस झाली आहे.डॉलर इंडेक्समध्ये 0.2 टक्क्याने घसरण झाली आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात डॉलरचे मुल्य घसरत आहे.

सोन्याची खरेदी वाढू शकते

कोटक सिक्योरिटीजच्या मते अमेरिकन डॉलरमध्ये चढउतारामुळे सोन्याच्या किंमतीतही चढउतार (gold silver rate today) कायम राहील. मात्र कमीत कमी भाव असताना सोन्याच्या खरेदी वाढू शकते. कमजोर डॉलरमुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेत अनिश्चितता जारी आहे.

केंद्रीय बँकांनी कमी केली सोन्याची खरेदी

जगभरातील केंद्रीय बँकांनी सोन्याची खरेदी कमी केली आहे. एका आकडेवाडीनुसार ऑगस्टमध्ये या केंद्रीय बँकांनी खरेदीपेक्षा जास्त सोन्याची विक्री केली आहे. या आधी जवळपास दीड वर्षापर्यंत केंद्रीय बँकांनी सातत्याने सोनेखरेदी केली होती. सोन्याच्या किंमतीत सातत्याने होणाऱ्या वाढीचे हे देखील एक कारण आहे.