Main Featured

IPL 2020- 'या' संघानं मुंबई इंडियन्सआधी प्ले ऑफमध्ये जागा केली पक्की

IPL 2020



आयपीएलच्या तेराव्या हंगामात (IPL 2020) सध्या प्ले ऑफच्या शर्यतीला सुरुवात झाली आहे. सर्व संघ टॉप-4मध्ये येण्यासाठी उत्सुक आहे. यातच एका संघानं मात्र प्ले ऑफमध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध (rajasthan royals)झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं (delhi capitals)13 धावांनी विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे. दिल्लीने ठेवलेल्या 162 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचे ओपनर बेन स्टोक्स आणि जॉस बटलर यांनी जलद सुरुवात करुन दिली. पण त्यांना मोठी पार्टनरशीप करता आली नाही.

Must Read

कोरोनाग्रस्त क्रिस्टियानो रोनाल्डोने तोडला 'नियम'


गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्सचा (delhi capitals) संघ पहिल्या क्रमांकावर आहे. दिल्लीनं 8 पैकी 6 सामने जिंकत 12 गुण मिळवले आहेत. त्यामुळे दिल्लीचा प्ले ऑफ गाठण्याचा मार्ग सुखकर झाला आहे. तर मुंबई इंडियन्सचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबईनं 7 पैकी 5 सामने जिंकत 10 गुण मिळवले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरचा संघ 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर चौथ्या स्थानावर कोलकाताचा संघ असता तरी हैदराबाद आणि चेन्नई संघानं प्ले ठफ गाठण्याची संधी आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने 7 पैकी केवळ 1 सामना जिंकला आहे. तर 6 सामने गमावले आहेत. त्यामुळे प्ले ऑफ गाठण्यासाठी त्यांना 16 गुण मिळवणे कठिण दिसत आहे. पंजाबचा या आयपीएलमधील  (IPL 2020) प्रवास जवळजवळ संपत आला आहे.