theft-and-various-criminals-using-date-technology"ते' कधी गुगल पे ( Google pay , तर कधी फोन पे (phonepeचा वापर करतात...केव्हा केव्हा तर थेट बॅंक खात्यातही पैसे भरण्यास सांगतात किंवा स्वतः भरतात. तुम्हाला प्रश्‍न पडला असेल ना हे "ते' म्हणजे कोण, ते काही सुजाण नागरिक नव्हेत, तर अशा पद्धतीने अद्ययावत तंत्रज्ञान, मोबाईलचा वापर करणारी ही मंडळी आहेत. चोर, गुन्हेगार ! तुम्हाला धक्का बसला असेल, पण हे खरे आहे. शहरात नुकत्याच घडलेल्या काही घटनांमध्ये या चोर, गुन्हेगारांकडून मोबाईल, इंटरनेटचा वापर करून नागरिकांना लुटण्याचे प्रकार घडले आहेत. 

शहरात मागील काही दिवसांपासून जबरी चोऱ्या, घरफोड्यासह विविध प्रकारचे गुन्हे सातत्याने घडत आहेत. मात्र त्यापैकी काही गुन्हे हे वेगळ्याच स्वरूपाचे घडत आहेत. विविध प्रकारची कार्यालये, एटीएम केंद्र, दुकाने या ठिकाणी चोरी करताना काही चोरट्यांकडून सीसीटीव्हीचे नियंत्रण करणारे डिव्हीआर, कॉम्पुटरचे सीपीयु देखील चोरून नेण्याचे प्रकार घडले आहेत. तर डिव्हीआरमुळे सीसीटीव्हीचा डेटा उपलब्ध होऊ शकत नसल्याने त्यांचा शोध घेणे पोलिसांना जिकिरीचे जात आहे. तर काही जणांकडून सीसीटीव्ही फोडण्याचे प्रकार शहरात घडले आहेत. मात्र आता चोरटे, गुन्हेगार त्याहीपुढे जाऊन गुन्हे करण्यामध्ये तंत्रज्ञानाचा अधिकाधिक फायदा घेऊ लागल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

Advertise

Must Read

तेजस्विनी पंडित फोटोशूट शेअर करत म्हणाली- "वाट पहाते मी गं...

 

जबरी चोरी, लूटमारीच्या घटनांमध्ये आरोपी नागरिकांकडून त्यांचे मोबाईल घेऊन, त्यामधील गुगल पे, फोन पे, पेटीएम (paytm login) यांसारख्या विविध प्रकारच्या पैशांची देवाण-घेवाण करणाऱ्या मोबाईल ऍपचा वापर करून त्याद्वारे स्वतःच्या गुगल पे, फोन पे व पेटीएम खात्यात थेट पैसे वर्ग करीत असल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या खिशात पैसे नसले तरी चोरट्यांकडून त्यांना व्यवस्थितपणे "कॅशलेस (Cashless' करण्याचे फंडे शोधले जात असल्याची सद्यःस्थिती आहे. पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी सराईत गुन्हेगारांकडून मात्र मोबाईलचा वापर टाळण्यावर भर दिला जात आहे. मोबाईलमुळे आरोपींचे वास्तव्य असलेले ठिकाण तसेच "सीनिअर'मुळे संपर्कातील लोकांची माहिती पोलिसांना मिळत असल्यामुळे गुन्हेगारांकडून कुठल्याही प्रकारचा मोबाईल वापरण्याचे टाळले जात आहे. 


घटना क्रमांक 1 ः धायरी परिसरात राहणाऱ्या विवाहित व्यक्तीची गे ऍप द्वारे रवी नावाच्या तरुणाशी ओळख झाली. त्यांच्यात चॅटिंग सुरू झाली, त्यानंतर समलैंगिंक संबंध (Gay relationship) ठेवण्यासाठी ते नांदेड परिसरातील एका घरात नऊ ऑगस्टला भेटले. दोघेजण समलैंगिक संबंध ठेवणार, तेवढ्यात तेथे आणखी दोघेजण आले. त्यानंतर रवीसह त्या दोघांनी समलैंगिक संबंध ठेवू इच्छिणाऱ्या विवाहीताला बेदम चोप दिला. त्याला तलवारीचा धाक दाखवीत त्याच्याकडील सोने-चांदीचे दागिने व पेटीएम, गुगल पे द्वारे 81 हजार स्वतःच्या पेटीएम, गुगल पे खात्यावर वर्ग केले. त्यानंतर त्याला धमकावून ते तिघेही निघून गेले. 


घटना क्रमांक 2 ः नांदेड सिटी येथे राहणाऱ्या जुनेद देशमुख या मित्राकडे केतन पाटील (वय 32, रा.डीएसके विश्‍व, धायरी) हे 6 ऑक्‍टोबर रोजी सायंकाळी साडे सात वाजता त्यांच्या कारमधून जात होते. चव्हाण बाग कॉर्नरपासून एक किलोमीटर अंतर पुढे आल्यानंतर तिघांनी त्यांची गाडी थांबविली. त्यानंतर त्यांना शिवीगाळ करीत फिर्यादीकडील मोबाईल हिसकावून घेतला. त्यांच्या मोबाईलमधील गुगल पेचा वापर करून चोरट्यांनी स्वतःच्या गुगल पे खात्यावर तीन हजार रुपयांची रक्कम वर्ग केली. त्यानंतर फिर्यादी धमकावून सोडून दिले. 


अशी घ्या काळजी 

- अनावश्‍यक मोबाईल ऍप डाऊनलोड करू नका 
- अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना काळजी घ्या 
- बॅंक किंवा स्वतःसंबंधीची गोपनीय माहिती इतरांना देऊ नका 
- अनोळखी व्यक्तींना भेटताना सार्वजनिक,गजबजलेल्या व सीसीटीव्हीच्या कक्षेच्या परिसरातच भेटा 
- अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन व्यवहार करू नका.