thackeray-government-will-take-big-step राज्यातील माता भगिनींसाठी सुरक्षेचे मोठे कवच निर्माण करणारा 'दिशा' कायदा येत्या अधिवेशनात संमत करून घेणार अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित दिशा कायदा अंमलबजावणी तसेच महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रतिबंध करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना या संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

याबाबत अनिल देशमुख म्हणाले की, दिशा कायदा () संदर्भात माता भगिनींसाठी मोठे सुरक्षा कवच निर्माण करण्यात येत असून यासंदर्भातील मसूदा अंतिम झाला आहे. याबाबत माता-भगिनी तसेच  तज्ञांकडून अधिक सूचना देऊन त्याचाही अंतर्भाव यात करण्याबाबतची कार्यवाही तातडीने पूर्ण करून हा कायदा येत्या अधिवेशनात संमत करून घेतला जाईल, या बैठकीत सर्व प्रकारच्या चांगल्या सूचना आलेल्या आहेत त्याची नोंद घेवून हा कायदा अधिक चांगल्या पद्धतीने कसा करता येईल याचा विचार शासन करत आहे असंही गृहमंत्र्यांनी सांगितले.

Advertise

नक्की वाचा 

 1 ] मोठी बातमी! मराठा आरक्षणाच्या बैठकीला उदयनराजेंची दांडी 

 2 ] अमीषा पटेलने शेअर केला बोल्ड व्हिडीओ, झाली ट्रोल 

 3 ] SSR Death Case- अखेर रिया चक्रवर्तीची तुरुंगातून सुटका

 4 ] पोलार्डची सुपरमॅनगिरी! VIDEO पाहून तुम्हीच सांगा सर्वात बेस्ट कॅच कोणता?

 5 ] एकनाथ खडसे 10-10 च्या मुहूर्तावर करणार राष्ट्रवादीत प्रवेश?

 6 ] आमदारानं 19 वर्षांच्या मुलीशी केलं लग्न

स्काईपद्वारे बैठकीत सहभाग

स्काईपद्वारे या बैठकीत सहभाग नोंदवत विधान परिषद उपसभापती श्रीमती नीलम गोऱ्हे तसेच चारूलता टोकस यांनी आपल्या सूचना मांडल्या. उपस्थित महिला प्रतिनिधीनींही सहभाग घेवून महत्त्वाच्या बाबी अधोरेखित केल्या. त्यात प्रामुख्याने महिला पोलीसांची संख्या वाढविणे, महिलांविषयक कायदे व सुविधा यांची अधिकाधिक प्रसिद्धी करणे, महिला आयोग अध्यक्ष व इतर सदस्यांच्या नियुक्त्या करणे, सोशल मीडिया संदर्भात अधिक जागरूकता, पोस्को केसेसचा निकाल, सायबर सेफ वुमन, महिलांसाठी विशेष न्यायालयाची निर्मीती करणे, दक्षता कमिटी, बीट मार्शल पद्धती, महिलांचे सेप्टी ऑडीट, गुन्हेगारांचा शिक्षा होण्याचा दर वाढविणे, महिलांसाठी कायदे विषयक माहिती केंद्र, महिलांसाठी सूचना, पत्र बॉक्स ठेवणे, महाविद्यालयात महिला पोलीस पथक,  महिला पोलीस पाटील, सरपंच व स्थानिक पोलीस पथक यांची समिती, शस्त्रास्त्र प्रदर्शन, लॉकडाऊन काळातील झालेले गुन्हे अशा विविध विषयांचा समावेश आहे.

या बैठकीस वरिष्ठ पोलीस अधिकारी  मिलींद भारंबे, रंजन कुमार शर्मा, एन. अंबिका, डी.के. नलावडे, गृह विभाग उपसचिव व्ही. एम. भट, मविम च्या अध्यक्षा श्रीमती ज्योती ठाकरे, रूपाली चाकनकर, श्रीमती निला लिमये, शिल्पा सोनुने, राखी जाधव, उत्कर्षा रूपवते, सुदर्शता कौशिक, सक्षणा सलगर, आदिती नलावडे तसेच राज्यातील विविध पक्षांच्या महिला पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.