बोरवडे (ता. कागल) येथील अल्पवयीन मुलीची छेडछाड करणाऱ्या संशयिताला ग्रामस्थांनी चांगलाच बेदम चोप दिला. या घटनेतील संशयित तरुण राधानगरी तालुक्‍यातील असल्याचे समजते. 

घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी, (teasing minor girl kolhapur) आज दुपारी दोनच्या सुमारास बोरवडेतील विठ्ठल मंदिरानजीक मुले खेळत होती. यावेळी संशयित तरुणाने मुलीशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. भेदरलेल्या मुलीने संशयिताच्या हाताला हिसका देऊन घरी पळ काढला. 

Advertise

Must Read

1) ड्रायव्हिंग लायसन्सचे नियम बदलणार

2) आता मोबाईलमधील प्रायव्हेट डेटा राहील १०० टक्के सुरक्षित

3) महेंद्रसिंग धोनीच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली

4) PHOTO:अमृता खानविलकरने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये केलं ग्लॅमरस फोटोशूट

5) विद्यापीठाच्या परीक्षांबाबत गोंधळ; प्रवेशपत्रात चुका


संबंधित बालिकेने घडलेली घटना घरी सांगताच तिच्या पालकांनी परिसरात शोधाशोध केली. या वेळी मोटारसायकलवरून जाणाऱ्या तरुणाला पाहताच मुलीने त्याला ओळखले. त्याने शेताकडील रस्त्यावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी पाठलाग केला असता संशयित दुचाकी टाकून उसाच्या शेतात लपून बसला. ग्रामस्थांनी शोधाशोध केल्यानंतर तो हाती लागला. यावेळी ग्रामस्थांनी त्याला बेदम चोप दिला. 


मनोरुग्ण असल्याचा संशय 

संशयित राधानगरी तालुक्‍यातील एका गावचा असून, तो मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यापूर्वीही त्याने आपल्याच गावात असा प्रकार केल्याची चर्चा गावामध्ये आहे.