Main Featured

तरुणीच्या डोळ्यातून खरंच वाहू लागले 'खून के आंसू'; पाहून डॉक्टरही झाले हैराण
एखाद्या गंभीर आजारात उलटी किंवा विष्ठेतून रक्त पडतं हे आपणा सर्वांना माहिती आहे. मात्र ब्राझीलमध्ये (brazil) एका 15 वर्षांच्या मुलीच्या अश्रूतून रक्त येऊ लागलं. एरवी खून के आंसू हे वाक्य बोलताना वापरलं जातं. मात्र या मुलीच्या डोळ्यातून खरंच खून के आंसू म्हणजे रक्ताचे अश्रू वाहू लागले आहेत. हे पाहून डॉक्टरही (doctor)हैराण झाले आहेत.

साओ पाओलात (sao paulo) राहणारी 15 वर्षांची डोरिस (Doris). 12 सप्टेंबरला तिला आजारी असल्यासारखं वाटत होतं. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिनं आपल्या पोटात तीव्र वेदना होत असल्याचं सांगितलं. डॉक्टरांनी तिच्या किडनीत स्टोन तर नाहीत ना याची तपासणी केली आणि तिला औषधं देऊन घरी पाठवलं.

Must Read

1) उद्योग क्षेत्रातील कामगारांना वेतनवाढ मिळण्याची शक्यता

2) आमिर खानच्या मुलीने दिली इन्स्टाग्रामवर धमकी...

3) अ‍ॅमेझॉन अन् फ्लिपकार्टला मनसेचा इशारा

4) लग्नाचं आमिष दाखवून रेपचा आरोप; मिथुन चक्रवर्ती यांच्या मुलासह पत्नीवर गुन्हा

5) मंत्रालय, स्वारगेट, कोल्हापूर, अलिबागसाठी ५० शिवशाही

6) 'वर्क फ्रॉम होम'मुळे सायबर गुन्ह्यात मोठी वाढ


13 सप्टेंबरला सकाळी उठल्या उठल्याच तिच्या एका डोळ्यातून रक्त येत होतं. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केली मात्र तिच्या डोळ्यांतून रक्त का निघतं आहे, याचं कारण डॉक्टरांनाही (doctor) समजलं नाही. तिला पुन्हा घरी पाठवण्यात आलं.

डोरिसची आई जुलियाना टेक्सेरा मिरांडाने (Juliana Teixeira de Miranda) सांगितलं, डॉक्टरांनी अनेक टेस्ट केल्या, मात्र डोरिसच्या आजाराबाबत माहिती झाली नाही. 14 सप्टेंबरला आम्हाला पुन्हा घरी पाठवण्यात आलं. डोळ्यांतून रक्त येण्याचं नेमकं कारण काय आहे, याची माहिती शोधण्यासाठी आम्ही देखील प्रयत्न करत आहोत.

नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. रफायेल एन्टोनिया बारबोसा डेल्सिन यांनी एका वेबसाइटशी बोलताना सांगितलं, "डोळ्यांतून रक्त येणं याला वैद्यकीय भाषेत (Hemolacria) म्हणतात. ही समस्या जास्त गंभीर नाही. रुग्णाच्या शरीरात एखादी समस्या असल्यास असं होतं. अनेक वेळा उपचारांशिवायदेखील ही समस्या बरी होते"(brazil)

"अँटिबायोटिक्स आणि हार्मोनल रेमेडिजद्वारे यावर उपचार शक्य आहे. याचं कारण काय आहे, कोणता आजार कारणीभूत आहे, त्यानुसार त्यावर उपचार केले जातात. डोरिसची अजून तपासणी सुरू आहे तिला नेमका कोणता आजार आहे हे माहिती नाही, त्यामुळे तिच्या उपचाराबाबत काही सांगू शकत नाही", असं डेल्सिन यांनी सांगितलं.