team-india-tour-of-australia-schedule-announce

भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान नोव्हेंबरमध्ये खेळवल्या जाणाऱ्या एकदिवसीय, ट्वेंटी-ट्वेंटी आणि कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. एडिलेड ओव्हल (Adelaide Oval) मैदानावर भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात डे-नाईट कसोटी सामना खेळवला जाणार आहे. 

Must Read

1) शिवसेना खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्याची सुपारी

2) येस बँकेप्रमाणेच पंजाब, महाराष्ट्र सहकारी बँक ठेवीदारांना...

3) CSK च्या सुपर फॅनचे दिड लाख फिटले; धोनीनं खुद्द घेतली दखल (VIDEO)

4) खासदार उदयनराजे सरकारवर भडकले

5) राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची संभाव्य यादी

भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिला एकदिवसीय सामना 27 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. तर 15 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान अखेरचा कसोटी सामना खेळला जाईल. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्या तीन एकदिवसीय, तीन टी-20 आणि चार कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यावरील सर्वात मोठा प्रश्न डे नाईट कसोटी सामन्याचा होता. परंतु 112 दिवसानंतर व्हिक्टोरियात लॉकडाऊन हटवण्यात आलं आहे. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने डे-नाईट टेस्ट एडिलेडच्या मैदानातून न हलवण्याचा निर्णय घेतला आहे. एकदिवसीय मालिका आणि टी -20 मालिका कॅनबेरा आणि सिडनी या दोन मैदांनावर खेळवली जाणार आहे. 

तर कसोटी मालिका चार वेगवेगळ्या मैदानांवर खेळवण्याचा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला आहे. सिडनीमध्ये टीम इंडिया 6 ते 8 डिसेंबर आणि 11 ते 13 डिसेंबर दरम्यान दोन सराव सामने खेळणार आहे. दुसरा सराव सामना डे-नाईट स्वरूपात होईल.


भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्यांच्या वेळापत्रक


पहिला सामना- 27 नोव्हेंबर (सकाळी 8 वाजता सुरु)
दुसरा सामना 29 नोव्हेंबर (सकाळी 8 वाजता सुरु)
तिसरा सामना- 2 डिसेंबर (सकाळी 8 वाजता सुरु)


पहिला सामना - 4 डिसेंबर (दुपारी 12.30 वाजता सुरु)
दुसरा सामना- 6 डिसेंबर (दुपारी 12.30 वाजता सुरु)
तिसरा सामना - 8 डिसेंबर (दुपारी 12.30 वाजता सुरु)


पहिला सामना- 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर (डे-नाईट सामना, सकाळी 8.30 वाजता सुरु)
दुसरा सामना- 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर (पहाटे 4.30 वाजता सुरु)
तिसरा कसोटी सामना- 7 जानेवारी ते 11 जानेवारी (पहाटे 4.30 वाजता सुरु)
चौथा सामना- 15 जानेवारी ते 19 जानेवारी (पहाटे 5 वाजता सुरु)


कसोटी संघ

विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, रिद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज

एकदिवसीय संघ

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर

टी -20 संघ

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अग्रवाल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्ती