Girish Mahajan




politics-
  जळगावमध्ये भाजपचे नेते आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना एका कार्यकर्त्याने शिवीगाळ केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तसंच या कार्यकर्त्याने एका भाजप पदाधिकाऱ्याच्या कारवर दगडफेक केल्याचे वृत्त आहे.

दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. बैठक आटोपल्यानंतर आमदार गिरीश महाजन आणि पदाधिकारी हे बाहेर आले होते. त्यावेळी एका कार्यकर्ता दरवाजातच लोळत होता. भाजपच्या कार्यकर्त्यांनी तो मनोरुग्ण असल्याचे सांगत त्याला बाजूला नेले होते

Must Read

1) अनिल अंबानी यांचे मुख्यालय जाणार येस बँकेच्या ताब्यात

2) अल्पवयीन मुलीवर पुण्यात सामूहिक बलात्कार

3) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जमीन घोटाळा केल्याचा गंभीर आरोप

4) PHOTOS: 'मिर्झापूर 2' मधील डिप्पी खऱ्या आयुष्यात आहे भलतील ग्लॅमरस, See Pics

5) टवटवीत आणि चमकदार त्वचेसाठी नियमित करा फक्त 6 योगासनं

त्यानंतर गिरीश महाजन यांनी माध्यमाच्या प्रतिनिधीशी संवाद साधून निघून गेले. काही वेळाने गिरीश महाजन हे पुन्हा एकदा भाजप कार्यालयात आले होते. त्यावेळी विजय नावाच्या या कार्यकर्त्याने महाजनांना शिवीगाळ केली. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने एका कारवर दगडफेक सुद्धा केली. या संपूर्ण घटनेबद्दल एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. (politics)

मात्र, ही व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता नसून मनोरुग्ण असल्याचं पक्षाकडून सांगण्यात आले आहे. या प्रकारानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी भाजपच्या कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

दरम्यान, 'सदर तरुण हा मद्यपी होता, तो अचानक कार्यालयात आला होता. त्यानंतर त्याने गोंधळ घातला. तो आमच्या पक्षाचा कार्यकर्ता नाही' असं महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी सांगितले.

भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला गिरीश महाजन, विजय पुराणीक, खासदार रक्षा खडसे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी हजर होते.