raju shetti

politics- अतिवृष्टीमुळं राज्यात शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आहे. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टीमुळं बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अकोला परिसरात कापूस आणि सोयाबीनचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र, केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी कृषीमंत्री केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाची माहिती सांगत आहेत, अशी टीका रविकांत तुपकर यांनी केली आहे. 

शेतकऱ्यांवर आलेल्या आर्थिक संकटातून त्याला बाहेर काढण्यासाठी कृषी मालाचे भाव स्थिर करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे. केंद्र सरकारने येत्या ५ नोव्हेंबरपर्यंत कृषीमालाचे भाव स्थिर केले नाही, तर केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर 'कपडे फाडो' आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. (politics)

Must Read 


स्वाभिमानीची 19 वी ऊस परिषद ऑनलाईन होणार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 19 वी ऊस परिषद (Sugarcane Conference) आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. परिषदेच्या परवानगीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि जिल्‍हाधिकारी दौलत देसाई यांच्यात आज (30 ऑक्टोबर) चर्चा झाली. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून हा निर्णय घेण्यात आला. नव्या निर्णयानुसार ऊस परिषद आता 2 नोव्हेंबरला जयसिंगपूरमधील विक्रमसिंह मैदानावर होण्याऐवजी आता कल्पवृक्ष गार्डन हॉल येथे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने येत्या 2 नोव्हेंबरला जयसिंगपूरमधील विक्रमसिंह मैदानावर ऊस परिषद घेण्याचे नियोजन केले होते. त्याची तयारीदेखील जवळपास पूर्ण झाली होती. मात्र, कोरोना संसर्गाची भीती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने या परिषदेसाठी परवानगी दिली नव्हती. त्यांनतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्वाभिमानी'च्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी आमंत्रित केलं होतं. या चर्चेनंतर परिषद ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला.