sushant-singh-rajputs-sisters-petition-reject

Bollywoood
दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतसाठी Sushant Singh Rajput बनावट औषधांचे प्रिस्क्रिप्शन मिळविल्याबद्दल नोंदविलेला गुन्हा रद्द करावा, यासाठी त्याच्या दोन्ही बहिणींनी दाखल केलेली याचिका फेटाळण्यात यावी, अशी विनंती सुशांतची मैत्रीण, अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने उच्च न्यायालयाला केली. रियाही सुशांत आत्महत्येप्रकरणी आरोपी आहे. सध्या तिची सुटका जामिनावर करण्यात आली आहे.

सुशांतच्या बहिणी प्रियांका सिंग Priyanka Singh आणि मीतू सिंग यांच्याविरुद्ध रियाने पोलिसांत तक्रार नोंदविली. हा गुन्हा रद्द करण्यासाठी दोघींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तर, या प्रकरणात रियाने  प्रतिज्ञापत्र दाखल केले. दोघींच्या याचिकेवर आक्षेप घेत त्यांची याचिका फेटाळावी, अशी विनंती न्यायालयाला केली. 

Must Read 

1) खासदार उदयनराजे सरकारवर भडकले

2) राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची संभाव्य यादी

3) देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्लाज्मा उपचार

4) नगरपालिकेत राडा; ज्येष्ठ नगरसेवकाला धक्काबुक्की

5) बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी सोपे आणि प्रभावी आयुर्वेदिक उपाय

6) बाईक प्रेमींसाठी खूशखबर, हीरोची हार्ले डेविडसनसोबत हातमिळवणी

पुढील सुनावणी ४ नाेव्हेंबरला

प्रियांका आणि मीतू या दोघांवरील केसचा तपास प्राथमिक टप्प्यात आहे. त्यामुळे तपास यंत्रणेला वेळ देण्याची आवश्यकता आहे, असे रियाने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. सुशांतला औषधे देण्यासाठी दाेघींनी बनावट वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनच्या आधारे एनडीपीएस कायद्यांतर्गत बंदी असलेली औषधे मिळवली, असा आरोप रियाने सुशांतच्या बहिणींवर केला आहे. त्या औषधांनंतर पाच दिवसांतच सुशांतचा मृत्यू झाला. ही औषधे सुशांतने घेतली हाेती की नव्हती? त्याच औषधांमुळे सुशांतचा मृत्यू झाला की नाही, हे तपास यंत्रणेला तपासावे लागेल, असेही रियाने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी ४ नोव्हेंबर रोजी ठेवली.