sushant singh rajputBollywood gosip- अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या  (sushant singh rajput)अत्महत्ये प्रकरणी NCBच्या हाती मोठा पुरावा लागला आहे. घराणेशाही. गटबाजी आणि त्यानंतर बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन प्रकरणी NCB कसून चौकशी करत आहे.  NCBने आता अंधेरीमधील वॉटर स्टोर रिसोर्टमध्ये सुशांत आत्महत्या प्रकरणी चौकशी केली आहे. सांगण्यात येत आहे की. सुशांत युरोप टूर अर्धवट सोडून थेट या रिसोर्टमध्ये येवून थांबला होता. 

एनसीबीने नोव्हेंबर २०१९ ते जून २०२० या कालावधीत अंधेरीमधील तपासादरम्यान सर्व महत्त्वाची  माहिती ताब्यात घेतली आहे. ज्यामध्ये सुशांत (sushant singh rajput) कोणाला भेटला होता. शिवाय कोणासोबत तो त्याठिकाणी राहिला होता. रिसोर्टमध्ये थांबण्याचे कारण या सर्व गोष्टींची चौकशी आता NCB करणार आहे. 

Must Read 


NCBच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , सुशांत रिसोर्टमध्ये थांबला होता तेव्हा एक फिल्ममेकर कायम त्याला भेटण्यासाठी रिसोर्टमध्ये येत होता. त्याच्या मृत्यूचं आणि बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरणाचं काही तरी कनेक्शन असेल असं मत NCBने मांडलं आहे. 

त्यामुळे फिल्ममेकरसोबतच अन्य व्यक्तींची चौकशी देखील याप्रकरणी करण्यात येणार आहे. यापूर्वी ड्रग्स प्रकरणी अनेक बडे कलाकारांना NCBच्या प्रश्नांचा सामना करावा लागला आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग यांची नावे बॉलिवूड ड्रग्स प्रकरणी समोर आली आहेत.