Main Featured

पवार कुटुंबियावर टीका केल्याशिवाय हेडलाइन्स होत नाहीत

pawa family
politics- सतत पवार कुटुंबियांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) हे लक्ष करत असून त्यावरुन खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) म्हणाल्या की, ज्या भागात कृषी विधेयकसाठी चंद्रकांतदादा पाटील यांनी रॅली काढली.

नक्की वाचा 

1) हिमालयात फुलला दुर्मिळ ब्रह्मकमळांचा मळा

2) एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यावरून शिवसेनेमध्ये नाराजी       का?

3) देशाला पहिला ऑस्करचा मान पटकावून देणाऱ्या मराठमोळ्या भानू अथैय्या यांचं निधन

 4)  कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

5) नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांची आॅनलाइन पायाभूत चाचणी


त्याच भागात त्यांच्या विचाराचा साखर कारखाना बंद असल्यामुळे त्यांनी लक्षात ठेवावे. तसेच हेडलाइन्स पवार कुटुंबियावर टीका केल्याशिवाय होत नसल्यामुळे कोणीही यावे आणि आपले मन मोकळे करावे, आम्ही दिलदार असल्याचे म्हणत सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. (politics)

त्याचबरोबर सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, दोन दिवसांत पुणे शहरातील पुरास कारणीभूत ठरलेल्या अंबिल ओढाच्या कामाबाबत वर्क ऑर्डर काढली जाणार आहे. तसेच गेल्या दोन वर्षांपासून पुण्यामध्ये होणाऱ्या पूर परिस्थितीस आम्ही जबाबदार असल्याच्या आरोपात तथ्य नसून दोन वर्षांपूर्वी सीमा भिंत पडली असून अद्यापही त्याचे काम पूर्ण झाले नाही. तर २५ वर्षाचा हिशोब यामध्ये कसा होऊ शकतो, असा प्रतिप्रश्न महापौर मुरलीधर मोहोळ यांना विचारत त्यांच्यावर सुप्रिया सुळेंनी निशाणा साधला.