sunny leone

Halloween-  हॉरर सिनेमा बघून भलेही काही लोकांना भिती वाटत असेल, पण एक मोठा वर्ग या जॉनरे सिनेमे आवडीने बघतो. पण विषय जर रील नाही रिअल लाइफचा असेल तर लोकांचा इंटरेस्ट आणखी वाढतो. या हॅलोवीनला वाचा काही सेलिब्रिटींसोबत झालेल्या काही अशा घटना ज्यांनी त्यांची झोप उडाली होती.

राजस्थानमध्ये सनीसोबत विचित्र घटना

सनी लिओनीही (sunny leone) तिच्या कामानिमित्ताने देशभरात फिरली आहे. पण राजस्थानमधील एक अनुभव कदाचित ती कधी विसरणार नाही. तिने सांगितले होते की, झोपताना तिला रूममध्ये फारच भीतीदायक अनुभव आला होता.

एका मुलाखतीत ती म्हणाली होती की, मला स्लीप पॅरालिसिस झाला होता. मला उठण्यासाठी माझी पूर्ण ताकद लावावी लागली होती. मला असं जाणवलं होतं की, कुणीतरी मला पकडून ठेवलंय. ही घटना जेव्हा तिसऱ्यांदा रिपीट झाली तेव्हा मी जोरात ओरडले होते की, 'मला एकटं सोडा'. सनीने सांगितले की, माझ्या ओरडण्याचा फायदा झाला आणि त्यानंतर ती आरामात झोपू शकली.

Must Read

1) अनिल अंबानी यांचे मुख्यालय जाणार येस बँकेच्या ताब्यात

2) अल्पवयीन मुलीवर पुण्यात सामूहिक बलात्कार

3) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जमीन घोटाळा केल्याचा गंभीर आरोप

4) PHOTOS: 'मिर्झापूर 2' मधील डिप्पी खऱ्या आयुष्यात आहे भलतील ग्लॅमरस, See Pics

5) टवटवीत आणि चमकदार त्वचेसाठी नियमित करा फक्त 6 योगासनं


'दिलवाले' शूटींगवेळी घाबरली होती क्रिती

'दिलवाले'च्या शूटींगवेळी क्रिती सेननसोबत विचित्र घटना घडली होती. तिच्या मेकअप आर्टिस्टला हॉटेल रूममध्ये कुणीतरी असल्याचा भास झाला होता. क्रितीने सांगितलं होतं की, तिच्या मेकअप आर्टिस्टला वाटलं होतं की, कुणीतरी तिला धक्का देत आहे. 

त्यावेळी एक लोशनची बॉटल टेबलवरून पडली होती. तेव्हा तर तिला कुणी स्पर्शही केला नव्हता. ती बॉटल उचलून त्याच जागी ठेवण्यात आली होती. आणि नंतर पुन्हा ती बॉटल पडली. त्यांनी जेव्हा लक्ष देऊन पाहिलं तर ना टेबल हलत होता आणि ना हवा होती. क्रितीने सांगितलं की, हा फार घाबरवणारा अनुभव होता.