harassment

kolhapur-
गावातील तरुणांकडून सतत होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून महाविद्यालयीन युवतीने आत्महत्या (suicide)केल्याचा धक्कादायक प्रकार नणुंद्रे (ता. पन्हाळा) येथे घडला. प्राजक्ता सुरेश बाऊचकर (वय 20) या महाविद्यालयीन युवतीचे नाव आहे. 


सतत होणारी छेडछाड सहन न झाल्याने (harassment)प्राजक्ताने 23 ऑक्टोबरला किटकनाशक प्राशन केले होते. शुक्रवारी उपचार सुरू असताना तिचा मृत्यु झाला. त्यानंतर नणुंद्रे गावात प्रचंड तणाव निर्माण झाला. जमावाने संशयित तीन आरोपींपैकी एका आरोपीच्या घरावर हल्ला केला. गावातील वातावरण तणावपूर्ण बनल्यानंतर तातडीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

Must Read

1) अनिल अंबानी यांचे मुख्यालय जाणार येस बँकेच्या ताब्यात

2) अल्पवयीन मुलीवर पुण्यात सामूहिक बलात्कार

3) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जमीन घोटाळा केल्याचा गंभीर आरोप

4) PHOTOS: 'मिर्झापूर 2' मधील डिप्पी खऱ्या आयुष्यात आहे भलतील ग्लॅमरस, See Pics

5) टवटवीत आणि चमकदार त्वचेसाठी नियमित करा फक्त 6 योगासनं

दरम्यान, मृत प्राजक्ताच्या आई वैशाली सुरेश बाऊचकर (वय 39) यांनी पन्हाळा पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर तिघा संशयितांना अटक करून गुन्हा नेंद करण्यात आला आहे. अजित तानाजी पाटील, अक्षय गणपती चव्हाण, प्रदीप कृष्णात पाटील, (तिघे राहणार नणुदे ता. पन्हाळा) अशी अटक केलेल्या तिघा संशयितांची नावे आहेत.

या घटनेची पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी नणुंदे येथील प्राजक्ता सुरेश बाऊचकर (वय 20) ही गावाशेजारील महाविद्यालयात शास्त्र शाखेच्या पहिल्या वर्षांत शिकत होती. तिच्या वडिलांचे 10 वर्षांपुर्वी सर्पदंशानंतर निधन झाले. त्यानंतर आईसमवेत ती रहात होती. अल्पभुधारक असलेल्या मायलेकींनी किराणा दुकानावर उदरनिर्वाह चालवला होता.  

अभ्यासात हुशार असणाऱ्या प्राजक्ताने या बिकट स्थितीवर मात करत महाविद्यालयीन शिक्षण घेण्यास सुरूवात केली. गावाशेजारील कॉलेजमध्ये ती शिकत होती.  महाविद्यालयातून घरी येताना संशयित तिघे तिची वारंवार छेड काढत होते, मोबाईलवरून फोन आणि मेसेज करून तिला त्रास देत होते. संशयितांकडून होणाऱ्या त्रासाची माहिती तिने आईलाही दिली होती.

संशयितांकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून (harassment)  प्राजक्ताने 23 ऑक्टोबरला रहात्या घरी किटकनाशक प्राशन केले. तिला गंभीर अवस्थेत कोल्हापुरातील  (kolhapur) खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचार सुरू असता शुक्रवारी सकाळी तिचा मृत्यू झाला, त्यामुळे सुरूवातीला आत्महत्त्येचा प्रयत्न अशी नोंद पन्हाळा पोलिसांत झाली होती, पण शुक्रवारी तिच्या मृत्यूची नोंद छेडछाडीला कंटाळून आत्महत्या अशी झाली आहे. तिला आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघा  संशयितांवर पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. संशयितांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी रात्री उशिरा दिली

तरुणीला आत्महत्येला प्रवृत्त (suicide) करणाऱ्या संशयितांना कडक शासन करावे, अशी मागणी बाऊचकर कुटूंबीयांनी केली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थिनीची छेडछाड अन् तिच्या आत्महत्त्येमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश पन्हाळा पोलिसांना दिल्याची माहिती सुत्रांनी दिली.