raj thackeray
politics- मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (raj thackeray) राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेच घेतली. वीजबिलासंदर्भात भेट घेतली असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

राज्यपालांशी बोलल्यानंतर ते बोलले पवार साहेबांशी बोलून घ्या, मुख्यमंत्र्यांशी बोलून घ्या, पवारांना मी फोन करणार असल्याचं राज ठाकरेंनी (raj thackeray) सांगितलं. 2 हजार बिलं येत होती तिथे लोकांना 10 हजार बिलं आता येत आहेत. त्यासाठी पहिलं निवेदन राज्यपालांना दिलं आहे. ही पाच पट, सहा पट बिलं बेरोजगारांनी कुठून भरावीत ते सांगा. (politics)


लवकरात लवकर निर्णय होईल, अशी आशा असल्याचं राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, हे सरकार कुंथत कुंथत चालत आहे. सरकारचे धरसोड धोरण आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.