CoronaVirus

कोरोना संक्रमणाच्या (Corona) वाढत्या केसेसमुळे युरोपात अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. इटली आणि स्पेन या देशात काही ठिकाणी रात्रीसुद्धा कफ्यू लावण्यात आला आहे. फ्रान्समध्येही दुसऱ्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. भारतातही मागच्या दोन दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सगळ्याच गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील संशोधकांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासात संसर्ग टाळण्याच्या २ उपायांबद्दल सांगितले आहे. 

Must Read

1) अनिल अंबानी यांचे मुख्यालय जाणार येस बँकेच्या ताब्यात

2) अल्पवयीन मुलीवर पुण्यात सामूहिक बलात्कार

3) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जमीन घोटाळा केल्याचा गंभीर आरोप

4) PHOTOS: 'मिर्झापूर 2' मधील डिप्पी खऱ्या आयुष्यात आहे भलतील ग्लॅमरस, See Pics

5) टवटवीत आणि चमकदार त्वचेसाठी नियमित करा फक्त 6 योगासनं

फिजिक्स ऑफ फ्लुइड या आरोग्य जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर आणि सोशल डिस्टेंसिग पाळणं  हे अतिशय प्रभावी उपाय आहेत. सामान्य फॅब्रिक्स मास्क देखील महत्त्वपूर्ण संरक्षण प्रदान करतात आणि कोविड- १९ चा प्रसार कमी होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीपासून  शारीरिक अंतर दुप्पटीने ठेवल्यास कोरोनापासून दुहेरी संरक्षण मिळू शकते. 

या अभ्यास अहवालाचे सह-लेखक जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील तज्ज्ञ रजत मित्तल म्हणाले की, जर तुम्ही इतरांपासून भौतिक, शारीरिक अंतर दुप्पट केले तर तुम्ही तुमची सुरक्षा देखील दुप्पट कराल. सामान्यपणे कोरोनापासून बचावासाठी दोन फुटांचे अंतर पाळण्याचा सल्ला दिला जात आहे.  फिजिक्स ऑफ फ्लुइड या संशोधन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासामध्ये असे म्हटले आहे की सामान्य कपड्यांचा मास्क देखील महत्त्वपूर्ण संरक्षण प्रदान करतो आणि कोरोनाचा प्रसार कमी करू शकतो. 

मित्तल म्हणाले की, ''श्वासोच्छ्वासाची गती वाढवत असलेल्या कोणत्याही शारीरिक कृतीमुळे प्रसार होण्याचा धोका वाढेल. शाळा, व्यायामशाळा आणि मॉल इत्यादी पुन्हा सुरू करण्याबाबत याचा काळजीपूर्वक विचार व्हायला हवा. '' कोरोना संक्रमण नियंत्रित करण्यासाठी सुरुवातीपासूनच या खबरदारी घेणं गरजेचं आहे. हातांची स्वच्छता, सामाजिक अंतर आणि मास्कचा वापर फार महत्वाचा आहे. यासह, आपल्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. जेणेकरून शरीराची रोगप्रतिकारशक्ती  चांगली राहील. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, आयुष मंत्रालयाकडून च्यवनप्राश, दूध-हळद व इतर आवश्यक गोष्टी प्रोटोकॉलमध्ये देण्यात आल्या होत्या. 

दरम्यान  देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.१५ टक्क्यांवर पोहोचले आहे, तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ६ लाखांहून कमी झाली आहे. शुक्रवारी ४८,६४८ नवे कोरोना रुग्ण सापडले असून, एकूण रुग्णसंख्या ८० लाख ८८ हजार झाली आहे. या संसर्गातून ७३ लाख ७३ हजारांहून अधिक जण बरे झाले आहेत.  केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.५० टक्के इतका कमी राखण्यात भारताला यश आले आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ८०,८८,८५१, तर बरे झालेल्यांची संख्या ७३,७३,३७५ झाली आहे. या आजाराने आणखी ५६३ जण शुक्रवारी मरण पावले असून, बळींचा एकूण आकडा १,२१,०९० झाला आहे.  जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशात अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे. तिथे ९२ लाख १२ हजारांपेक्षा अधिक रुग्ण आहेत.