Main Featured

राज्यातील मंदिरं खुली करण्यासाठी भाजपचं राज्यव्यापी आंदोलन

temple start in maharashtra
Maharashtra- राज्यात कोरोना शिरकाव (corona) झाल्यानंतर टाळेबंदीची घोषणा करण्यात आली होती. मात्र पुनश्च हरिओम अंतर्गत अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सध्या राज्यात अनलॉक 5 सुरू असून, मंदिरं उघडी करण्यासाठी भाजपच्या वतीने आज राज्यभरात मंदिरं खुली (temple) करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे.

Must Read

1) कोल्हापुरी! ऑनलाईन दुकानात आता घरबसल्या मिळणार अस्सल कोल्हापुरी चप्पल

2) महाविकासआघाडी सरकार हे बिघाडी सरकार आहे : हर्षवर्धन पाटील

3) प्रेग्नन्सीची न्यूज दिल्यानंतर अनिता हसनंदानी शेअर केले असे PHOTO

4) शुल्लक कारणावरुन रिक्षाचालकाला मारहाण; VIDEO

5) डोक्यात लोखंडी रॉडने वार करत पत्नीला संपवलं


ठाकरे सरकारने (state government) मंदिरं उघडी करायला परवानगी द्यावी अशी प्रमुख मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराच्या आत भाजपच्या कार्यकर्त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला असून, पोलीसांनी प्रविन दरेकर आणि प्रसाद लाड यांना ताब्यात घेतले आहे. तसेच राज्यपालांनीसुद्धा मंदिर बंद असल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, आज राज्यभरातील मंदिरांसमोर मंदिराचे  (temple)  द्वार उघडण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. शिर्डीतील साईबाबा मंदिर, मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर, पुण्यातील तांबडी जोगेश्वरी मंदिर तसेच नागपूरातील साई मंदिरासमोर भाजप अध्यात्मिक आघाडीचं आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. 


दरम्यान मंदिरं खुली करण्यासाठी या आधीसुद्धा भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आला होता. मात्र ठाकरे सरकराने त्याचे फारसे गांभीर्य घेतले नव्हते. त्यानंतर पुन्हा आता आज राज्यभरात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे.