Main Featured

'मोदी... मोदी... Yes पापा, एनी डेव्हलपमेंट NO पापा'

central government pm narednra modi

politics- केंद्र सरकारने (central government) तीन नवीन कृषी विधेयकांना संसंदेच्या दोन्ही सभागृहात मंजुरी दिली आहे. मोदी सरकारच्या या विधेयकांना काँग्रेससह इतरही अनेक पक्षांनी विरोध केला आहे. विशेष म्हणजे पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी या विधेयकांना मोठ्या प्रमाणात विरोध केला असून शेतकरी मोदी सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात लहानांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकजण सहभागी होताना दिसत आहेत. अशाच एका आंदोलनातील चिमुकल्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाला आहे.

Must Read

1) आमदारानं 19 वर्षांच्या मुलीशी केलं लग्न

2) मराठमोळी नेहा पेंडसे एथनिक ड्रेसमध्ये दिसते झक्कास..! Photos

3) राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराला 12 लाखांचा दंड

4) शिक्षक भरती घोटाळ्यात भाजपा नेत्याला अटक

5) Video: १०३ वर्षीय आजोबांनी १४ हजार फुटांवरुन मारली उडली


मोदी सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध करत पंजाबमधील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच, अकाली दलाच्या नेत्या आणि खासदार हरसीमरत कौर यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामाही दिला आहे. 

पंजाबमधील काँग्रेससह अकाली दलानेही मोदी सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध करत, शेतकऱ्यांच्या बाजुने आंदोलन उभारले आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये या विधेयकाचा विरोध होत असून शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. मध्य प्रदेशमध्येही काही प्रमाणात मोदींच्या या कृषीविषयक धोरणाला शेतकरी संघटना व राजकीय पक्षांनी विरोध दर्शवला आहे. 

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एका चिमुकलीचा फोटो शेअर केला आहे. या चिमुकलीच्या हातात मोदींचे चित्र असलेला कागद असून त्यावर एक कविता लिहिलेली आहे. जॉनी.. जॉनी.. एस पापा या कवितेचं हे विडंबन असून मोदींवर (pm narendra modi) गोड शब्दात टीका करण्यात आली आहे. दिग्विजय सिंह यांनी हा फोटो शेअर करत, सध्या देशातील मूळ परिस्थिती हीच, नर्सरी स्कुलच्या या कवितेतील ओवींप्रमाणेच असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे.     


कृषी कायद्याला विरोध, देशाचे नुकसान 

"मी तुम्हाला विचारू इच्छितो, हे कायदे या संकटाच्या काळातच का लागू केले गेले? एवढी घाई कशाची होती? कारण मोदीजींना माहीत आहे, की शेतकरी आणि मजुरांच्या पायावर कुऱ्हाड मारली, की ते घरातून बाहेर निघू शकणार नाहीत. 

नरेंद्र मोदी (pm narendra modi) केवळ ही व्यवस्था नष्ट करत आहेत. जेथे त्यांनी MSPची हमी द्यायला हवी, तेथे ते या तीन कायद्याच्या माध्यमाने शेतकरी आणि मजुरांना मारत आहेत. त्यांचा गळा कापत (politics)आहेत. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना दोनच पर्याय उपलब्ध असतील. ते म्हणजे, अडानी आणि अंबानी. 

आता आपणच सांगा, एक शेतकरी त्यांच्याशी लढू शकतो? त्यांच्याशी बोलू शकतो? मुळीच नाही, सर्व काही नष्ट होईल. हेच मोदींचे लक्ष्य आहे. येथे मी केवळ शेतकऱ्यांसाठीच उभा नाही, तर भारतातील सर्व जनतेसाठी उभा आहे. कारण केवळ शेतकरी आणि मजुरांचे नाही, तर संपूर्ण देशाचे नुकसान होत आहे," असेही राहुल गांधी म्हणाले.