shraddha kapoorbollywood gossip-
छोट्या पडद्यावर अनेक अभिनेत्रींनी नागिणीची भूमिका साकारली. मोठ्या पडद्यावरही दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी इच्छाधारी नागिणीची भूमिका साकारली. आता अभिनेत्री श्रद्धा कपूर (shraddha kapoor)अशीच भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचं नाव अद्याप जाहीर झालं असून विशाल फुरिया त्याचं दिग्दर्शन करणार आहेत. विशाल यांनी मराठीतील ‘लपाछपी’ या थरारपटाचं दिग्दर्शन केलं होतं.


‘ऑनस्क्रीन नागिणीची भूमिका साकारण्याची मला संधी मिळाली आहे. नगिना आणि निगाहें या चित्रपटात श्रीदेवी यांना मी नागिणची भूमिका साकारताना पाहिलंय. अशा प्रकारची भूमिका साकारण्याची माझी फार इच्छा होती’, असं श्रद्धाने ट्विटरवर म्हटलंय.


Must Read

1) शिवसेना खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्याची सुपारी

2) येस बँकेप्रमाणेच पंजाब, महाराष्ट्र सहकारी बँक ठेवीदारांना...

3) CSK च्या सुपर फॅनचे दिड लाख फिटले; धोनीनं खुद्द घेतली दखल (VIDEO)

4) खासदार उदयनराजे सरकारवर भडकले

5) राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची संभाव्य यादी

श्रद्धा कपूरचा  (shraddha kapoor) हा आगामी प्रोजेक्ट तीन चित्रपटांची सीरिज असेल. निखिल द्विवेदी त्याचे निर्माते असतील. या चित्रपटाचं नाव आणि त्यात इतर कोणते कलाकार असतील याबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. श्रद्धाने याआधी ‘स्त्री’ या हॉरर कॉमेडी चित्रपटात भूमिका साकारली होती. त्यानंतर आता ती एका इच्छाधारी नागिणीची भूमिका साकारणार आहे.