cm uddhav thackeraypolitics news- मराठी बोलण्यासर नका देत 75 वर्षीय महिलेला दुकानाबाहेर काढणाऱ्या सराफ दुकानदाराने अखेर माफी मागून आंदोलन मागे घेण्याची विनंती शोभा देशपांडे यांना केली. मराठीचा आग्रह धरत आंदोलन केलेल्या शोभा देशपांडे यांचे वृत्त मीडिया आणि सोशल मीडियात झळकताच, मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होतीतसेच, या महिलेशी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (cm uddhav thackeray)फोनवरुन संवाद साधला आहे. मात्र, केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंनी या महिलेच्या शिवसेनेच्या भूमिकेला आपला विरोध दर्शवला आहे.


Must Read

1) मराठा संघटनांकडून उद्याचा महाराष्ट्र बंद मागे

2) आता येतंय Green Ration Card

3) टीव्ही टीआरपी रॅकेटचा पर्दाफाश; ‘रिपब्लिक’सह ३ चॅनल्सची चलाखी

4) क्रीडा विभागातून कुस्तीपटू बबीता फोगटचा राजीनामा

5) COVID-19 : मॉडर्ना कंपनीने कोरोना लशीसंदर्भात घेतला मोठा निर्णयमहाराष्ट्रात विशेषत: मुंबईतच अनेकदा माय मराठीचा अवमान झाल्याच्या घटना उघडकीस येतात. काही अमराठी भाषिकांकडून मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देत मराठी माणसांना, मराठीजनांना डिवचण्याचं काम होतंय. आज पुन्हा एकदा अशीच घटना मुंबईतील कुलाबा परिसरात उघडकीस आली होती. येथील महावीर ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानदाराने शोभा देशपांडे यांना मराठी बोलण्यास नकार देऊन महिलेस अरेरावी केली, दुकानाचा परवाना दाखवण्यास मनाई करून पोलिसांना बोलावून अपमानित केले


त्यानंतर, गुरुवारी सायंकाळ वाजल्यापासून त्यांनी दुकानासमोर ठिय्या मांडून आंदोलन सुरू केले होते. या महिलेच्या आंदोलनास मनसे, शिवसेना आणि महाराष्ट्रातून अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी लेखिका शोभा देशपांडे आणि शिवसेनेच्या भूमिकेशी सहमत नसल्याचे म्हटले (politics news)आहे.


'फक्त मराठी बोलण्याची सक्ती हे संविधान विरोधी आहे. शिवसेनेत उत्तर भारतीय/ दक्षिण भारतीय विंग आहेत. ते सगळे मराठी बोलतात का?, असा सवाल आठवलेंनी उपस्थित केला. तसेच, मराठी बोलणं सक्तीचं करता येणार नाही, शोभा देशपांडे आणि शिवसेनेच्या भूमिकेला माझा विरोध, आहे असं म्हणत शिवसेना मराठी भाषेचं राजकारण करतेय, असेही आठवलेंनी म्हटले.