Main Featured

शिवसेनेच्या आमदाराची गुंडगिरी!

shivsena mla bullying

 

Politicsराज्यात अनेक प्रश्न समोर असताना शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांना नेमकं काय झालं आहे असा प्रश्न पडत आहे. याचं कारण म्हणजे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचा रत्नागिरीतील ग्रामदैवतेच्या मंदिरात संयम सुटला आणि त्यांनी वृद्ध व्यक्तीला शिवीगाळ करत मारहाण (bullying)केली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असू त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (social media)तुफान व्हायरल होत आहे.

Must Read

1) मराठा संघटनांकडून उद्याचा महाराष्ट्र बंद मागे

2) आता येतंय Green Ration Card

3) टीव्ही टीआरपी रॅकेटचा पर्दाफाश; ‘रिपब्लिक’सह ३ चॅनल्सची चलाखी

4) क्रीडा विभागातून कुस्तीपटू बबीता फोगटचा राजीनामा

5) COVID-19 : मॉडर्ना कंपनीने कोरोना लशीसंदर्भात घेतला मोठा निर्णय

6) प्रकाश आंबेडकर यांचे वादास निमंत्रण…

आमदार भास्कर जाधव यांनी शारदादेवीच्या मंदिरात अर्वाच्च भाषेत जोरदार शिवीगाळ करत गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला. एका वृद्ध व्यक्तीला शिवीगाळ करत मारहाण केल्याचं या व्हिडीओमध्ये कैद झालं आहे. या सगळ्या प्रकरणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (social media) तुफान व्हायरल झाल्यानं शिवसेनेसमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. हा सर्व प्रकार शारदा देवी मंदिर ट्रस्टच्या पदाधिकारी आणि ग्रामस्थ समिती यांच्या बैठकीदरम्यान झाल्याची माहिती मिळत आहे.

मारहाणीचा व्हिडीओ सीसीटिव्हीत कैद झाला आहे. यासंदर्भातील कुठलीच तक्रार अद्याप नोंदवलेली नाही. संबंधित मारहाणीचा आणि शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ 6 ऑक्टोबर दरम्यानचा असल्याचं सांगितलं जात आहे. तर या बैठकीला भास्कर जाधव यांना बोलवलं नाही म्हणून त्यांनी हा गोंधळ घातला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. या प्रकरणी आमदार भास्कर जाधव यांच्यावर काय कारवाई होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.